Sri Lanka in Financial Crisis: श्रीलंका आर्थिक टंचाईत, भारताने दिले 50 करोड डॉलर्सचे कर्ज
Financial Crisis | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारताचा शेजारी देश श्रीलंका मोठ्या आर्थीट टंचाईचा (Sri Lanka in Financial Crisis) सामना करत आहे. कोरोना व्हायरस आणि देशांतर्गत निर्माण झालेली स्थिती याचा जोरदार परीणाम श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे श्रीलंका सरकार आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. दरम्यान, भारताने श्रीलंकेला आर्थिक टंचाईतून बाहेर पडण्यासाठी हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला 50 कोटी डॉलरचे कर्ज (India Gives Sri Lanka $500 Million Loan) देण्याची घोषणा केली आहे. उभय पक्षांनी त्याबाबत करारावर स्वाक्षरी केल्याचेही वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

आर्थिक टंचाईचा सामना करत असल्याने श्रीलंकेचा थर्मल पॉवर जनरेटर योग्य पद्धतीने काम करत नाही. त्यामुळे श्रीलंकन सरकार समोर विजेचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट नेटवर्कमध्येही मोठा अडथळा निर्माण होतो आहे. कोळशावर आधारीत पॉवर प्लांटमध्येही वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याने नागरिकांना अघोषीत विजकपातीचा सामना करावा लागतो आहे.

अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उभय देशांनी औपचारिकरित्या दोन्ही करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या आधी भारताने श्रीलंकेला नुकताच 91.05 कोटी डॉलरचे आर्थिक सहाय्य केले होते. भारतातील राजदुताने म्हटले की, आवश्यक खाद्यपदार्थ आणि औषधांच्या तत्कालीन आयातीसाठी एक अब्ज डॉलरची क्रेडीट लाईनवर भारतासोबत चर्चा सुरु आहे. अधिकाऱ्यांने म्हटले की, श्रीलंकेसाठी भारतीय प्रशासनाकडून पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यासाठी 50 कोटी डॉलर देण्यात आले आहेत. (हेही वाचा, Facebook, Twitter, Instagram वर चीनी प्रोफाईल मधून संवादासाठी वाढत आहेत रिक्वेस्ट्स)

श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत अन्नपदार्थ, वाहन आणि सीमेंट यांसारख्या गोष्टींचीही कमतरता भासत आहे. खाद्यपदार्थांची समस्याही पाहायला मिळत आहे. त्यामुळे यापाठीमागे खाद्य महागाई पाठीमागील महिन्यात वाढून विक्रमी 25% वर पोहोचली आहे.