सध्या सोशल मीडीयामध्ये ट्वीटर (Twitter), फेसबूक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) युजर्सना अचानक चायनीज प्रोफाईल मधून कम्युनिकेशन साठी रिक्वेस्ट येत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांच्या दाव्यानुसार त्यांना अपरिचित चीनी अकाऊंट वरून मेसेज देखील येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही ट्वीटर अकाऊंट्स कडून चीनी प्रोफाईल कडून त्यांना कम्युनिकेशन साठी प्रयत्न करणार्यांची संख्या अधिक असल्याचेही समोर आले आहे.
सध्या हे केवळ ट्वीटर पुरतं मर्यादित नसून चीनी स्कॉलर्सना देखील विचित्र, अनोळखी चीनी प्रोफाईलवरून ट्वीटर, फेसबूक, इंस्टा वर मेसेजेस येत आहेत. दरम्यान हा प्रकार डिसेंबरच्या पूर्वार्धामध्ये जेव्हा ट्वीटर कडून करण्यात आलेल्या कारवाई मध्ये 2048 अकाऊंट्स उडवण्यात आली होती तेव्हा झाला आहे.
Stanford Internet Observatory येथील ट्वीटर टीम कडून घेण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांनी तपासलेल्या दोन नेटवर्क मध्ये Xinjiang मधील Uyghurs हे प्रामुख्याने कंटेट पोस्ट करत आहेत. यामध्ये चीन मध्ये त्यांचं आयुष्य कसं आहे याची माहिती, व्हिडिओ पोस्ट केलेला असतो. हे देखील नक्की वाचा: चीन मध्ये Google, Facebook नंतर आता LinkedIn सुद्धा होणार बंद, मायक्रोसॉफ्टने केली मोठी घोषणा .
दरम्यान डिसेंबर 2021 च्या सुरुवातीला ट्विटरने दोन चिनी राज्य-संबंधित इंफ्लुएंस ऑपरेशन्स काढून टाकण्याची घोषणा केल्यानंतर हा प्रकार सुरू झाला आहे. यामध्ये 2,048 खाती ज्यांनी चीनी कम्युनिस्ट पार्टी (CCP) शिनजियांग प्रदेश आणि तिथल्या उईघुर (Uyghur) लोकसंख्येबद्दलच्या कथनांना चालना दिली आणि 112 खाती चांग्यू संस्कृतीला (Changyu Culture) दिली गेली, शिनजियांग प्रादेशिक सरकारच्या वतीने काम करणारी खाजगी कंपनी, फॉरेन पॉलिसीने अहवाल दिला आहे.