Porn Videos of Girl Students: पाकिस्तानचे Islamia University बनला ड्रग्ज आणि सेक्सचा अड्डा; समोर आले विद्यार्थिनींचे 5,000 हून अधिक अश्लील व्हिडिओ
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील इस्लामिया विद्यापीठातील (Islamia University) शेकडो विद्यार्थिनींचे 5500 अश्लील व्हिडिओ (Porn Videos) समोर आले असून, त्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पंजाब प्रांताचे कार्यवाहक मुख्यमंत्री सय्यद मोहसीन रझा नक्वी यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांनी हे पॉर्न व्हिडिओज हटवण्यास सुरुवात केली आहे. य प्रकरणी विद्यापीठाचे वित्त संचालक डॉ अबुजार, मुख्य सुरक्षा अधिकारी सय्यद एजाज शाह आणि वाहतूक अधिकारी अल्ताफ यांना अटक करण्यात आली आहे.

मात्र, हा सर्व प्रकार विद्यापीठाच्या विरोधात षड्यंत्र रचून केला जात असल्याचे संस्थेच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. एजाज शाह याच्याकडे केवळ शेकडो मुलींचे अश्लील व्हिडिओच सापडले नाहीत, तर 8 गम 'आईस ड्रग'ही जप्त करण्यात आले आहे. विद्यापीठात असे 113 विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना अंमली पदार्थांचे व्यसन लागले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, आता त्यांचे टार्गेट विद्यापीठ नसून अमली पदार्थ तस्करांवर कारवाई करणे हे आहे.

एजाज शाह गेल्या 7 वर्षांपासून या पदावर आहे. माहितीनुसार, एके दिवशी दारू पिऊन तो एका मुलीला गाडीत घेऊन जात होता, मात्र पोलिसांना पाहताच तो राँग साइडने पळू लागला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले व तपास केला असता त्याच्या कारमधून अनेक ड्रग्ज जप्त करण्यात आले. चौकशीत तो विद्यापीठातील या तरुणीला तिच्या घरी सोडणार असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांना बोलावून तिला त्यांच्या ताब्यात दिले.

त्यावेळी एजाज शाहच्या 2 फोनमधून 5500 पॉर्न व्हिडिओ सापडले, जे विद्यापीठातील मुलींचे आहेत. हे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मुलींना मार्क देण्याच्या बदल्यात त्यांचे न्यूड अवस्थेतील व्हिडिओ मागवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासह विद्यापीठातील कोणत्याही पदावरील महिला भरतीसाठीही हेच केले जात होते. पोलिसांचे म्हणणे आहे की शिक्षकांचा एक संपूर्ण गट अंमली पदार्थांची विक्री आणि मुलींच्या लैंगिक छळात सामील आहे. (हेही वाचा: भविष्यात लैंगिक संबंधांमध्ये एआय चलित 'सेक्स रोबोट्स' घेतील खऱ्या पार्टनर्सची जागा; माजी Google अधिकाऱ्याचा दावा)

यासोबतच, विद्यापीठातील विद्यार्थिनींना डान्स आणि सेक्स पार्ट्यांमध्ये भाग घेण्यास भाग पाडले गेले होते. विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांसोबत कॅम्पसमध्ये अश्लील पार्ट्या झाल्या होत्या. ही माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. दक्षिण पंजाबचा शिक्षण विभाग याची चौकशी करणार आहे. तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.