AI-Powered Sex Robots (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिवसेंदिवस आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये (Artificial Intelligence-AI) लक्षणीय प्रगती होत आहे. सध्या अनेक उद्योगांचा बराच मोठा भाग आर्टिफिशियल इंटेलिजन्सने व्यापला आहे. अशात आता वैयक्तिक जीवनातही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिरकाव होऊ घातला आहे. गुगलच्या एका माजी अधिकाऱ्याने असा दावा केला आहे, जो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्यांच्या मते, येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शारीरिक संबंधांमध्ये (Sex) लोकांच्या पार्टनर्सची जागा घेऊ शकतील.

गुगलचे माजी कार्यकारी मोहम्मद 'मो' गावदत (Mohammad ‘Mo’ Gawdat) यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत एक भविष्यवाणी केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, एआय पॉवर्ड सेक्स रोबोट्स (AI-Powered Sex Robots) आयुष्यात अशा प्रकारे प्रवेश करतील की, ज्यामुळे वास्तविक पार्टनर्स निघून जातील.

अहवालानुसार, गावदत यांनी यूट्यूबवर टॉम बिलीयू यांच्या ‘इम्पॅक्ट थिअरी’ पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केले. गावदत म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला विशेष हेडसेट वापरून लैंगिक अनुभव प्रदान करेल. ज्याप्रकारे Apple's Vision Pro किंवा Quest 3 आपल्याला आभासी गोष्टी वास्तवात दाखवतात, तसेच हे घडेल.

एआय पॉवर्ड सेक्स बॉट्सच्या मदतीने, खऱ्या पार्टनर्सची संवाद साधत असल्याचा अनुभव मिळेल. गावदत यांनी असेही सांगितले की, कधीकधी ज्या गोष्टी वास्तविक नाहीत, त्यांच्याद्वारे आपल्या मेंदूला आपण फसवू शकतो. हे एआय पॉवर्ड सेक्स रोबोट्स तसेच काम करतील. दुसरीकडे, एआय-चालित बॉट्सला ‘संवेदनशील’ मानले जावे की नाही याबद्दल सतत वादविवाद चालू आहे. कारण काहींच्या मते त्यांनाही मानवांसारख्या भावना आणि विचार आहेत. याबाबत गावदत म्हणतात की, जर आपल्याला एआयशी चांगला बंध असल्याची भावना असेल, तर ते खरे आहेत की नाही याने काही फरक पडत नाही. (हेही वाचा: पत्नीने दुसऱ्या पुरुषासोबत चित्रित केला 'पॉर्न व्हिडिओ'; आनंद साजरा करण्यासाठी यूट्युबर पतीने भेट दिली लॅम्बोर्गिनी)

सरतेशेवटी, गावदत यांना विश्वास आहे की, एआयमुळे प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल विचार करण्याची पद्धत बदलेल. जसजसे तंत्रज्ञान अधिक प्रगत होत जाईल, तसतसे मानवी आणि कृत्रिम परस्परसंवादांमधील फरक सांगणे कठीण होऊ शकते. त्यांच्यामते, भविष्यात एआय आधारीत पार्टनर्स असणे हे अधिक सामान्य असेल आणि ते समाजात स्वीकारलेही जाऊ शकते. मात्र यामुळे ते योग्य आहे का? त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यातील एक महत्वाची जागा भरून निघेल का? असे अनेक महत्त्वाचे प्रश्‍नही समोर येतील.