Kris Wu: लोकप्रिय गायक-अभिनेता क्रिस वू ला 18 वर्षीय तरुणीने बलात्कार केल्याप्रकरणी 13 वर्षांचा तुरुंगवास
Kris Wu (PC - Instagram)

Kris Wu: लोकप्रिय गायक आणि अभिनेता क्रिस वू (Kris Wu) बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. बलात्कार प्रकरणातील (Rape Case) आरोपी क्रिस वू याला चीनच्या न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्यासाठी त्याला कठोर शिक्षा सुनावली आहे. चिनी-कॅनडियन गायक-अभिनेता क्रिस वू याच्यावर 18 वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. पीडितेने क्रिस वूवर एका सोशल मीडिया पोस्टमध्ये गंभीर आरोप केले असून, सिंगरने वयाच्या 17 व्या वर्षी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड केले आहे. या प्रकरणी कोर्टाने ख्रिस वूला दोषी ठरवून 13 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी बलात्काराच्या आरोपानंतर अनेक मोठ्या ब्रँड्सनी ख्रिस वूसोबतची भागीदारी संपवली. यामध्ये पोर्श आणि लुई व्हिटॉनसह अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांनी ख्रिस वूसोबत जाहिराती आणि इतर करार संपवले आहेत.

क्रिस वू हा बलात्कार आणि सामूहिक अनैतिकतेसाठी दोषी आढळला होता, असे वृत्त IANS ने दिले होते. शिक्षा ठोठावल्यानंतर त्याला हद्दपार करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वूला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर औपचारिक आरोप ठेवण्यात आले होते. जुलै 2021 मध्ये, ग्लॅमर उद्योगाशी संबंधित एका 18 वर्षीय तरुणीने वू यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. (हेही वाचा - Girl Born with Tail: 6 cm लांबीच्या शेपूट सह जन्माला आली बालिका; Mexico मधील घटना)

दारूच्या नशेत वू डेटने तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पीडितेने दोन अल्पवयीन मुलांसह इतर मुलींसोबतही असेच कृत्य केल्याचा आरोप केला आहे. वूने त्यावेळी आपल्यावरील सर्व आरोप नाकारले होते. परंतु दोन आठवड्यांनंतर, बीजिंगमधील चाओयांग जिल्हा पीपल्स प्रोक्युरेटरने अधिकृत निवेदन जारी केले की, त्यांनी वूच्या अटकेला कायद्यानुसार तपास केल्यानंतर मान्यता दिली आहे. (हेही वाचा - Florida Crime: डॉक्टरने उपचारादरम्यान दोन महिलांना गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये, बलात्काराच्या गुन्ह्यात सहसा तीन ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असते. मात्र, विशेष प्रकरणांमध्ये जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षाही होऊ शकते. चीनमध्ये जन्मलेला ख्रिस वू हा कॅनडाचा नागरिक असला तरी त्याच्यावर चीनमध्ये खटला चालवण्यात आला आहे आणि शिक्षाही झाली आहे. ख्रिस वू ला चिनी भाषेत वू यिफान म्हणून ओळखले जाते.