Florida Crime: डॉक्टरने उपचारादरम्यान दोन महिलांना गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार
Rape | Representational Image (Photo Credits: ANI)

Florida Crime: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लोरिडाच्या एका डॉक्टरवर 2 महिलांवर  कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नेपल्सचे डॉक्टर, एरिक अँड्र्यू सलाटा असे त्या डॉक्टरचे नाव आहे. नेपल्स डेली न्यूजने मिळवलेल्या पोलिसांच्या अहवालानुसार, महिलांनी आरोप केला आहे की, कॉस्मेटिक प्रक्रिया सुरु असतांना डॉक्टरांनी महिलांना मारहाण केली वेदना होऊ नये म्हणून  लाफिंग गॅसही दिला होता, असे पोलिस अहवालात म्हटले आहे. दरम्यान, महिलांना गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचे महिलांनी आरोप केला आहे. जेव्हा महिला शुद्धीवर आली, तेव्हा तो तिच्यावर बलात्कार करत असल्याचे तिला दिसले, असे तिने सांगितले आहे. [ हे देखील वाचा: Florida: फ्लोरिडातील महिलेने नृत्य करून सांगितली पतीच्या निर्घृण हत्येची कहाणी, अनेकांनी केले ट्रोल, पाहा व्हिडीओ ]

WZVN च्या मते, सलाता त्यांच्या पत्नीसह पुरा विडा मेडिकल स्पा चे मालक आहेत. दोन्ही महिलांच्या  प्रक्रियेदरम्यान, सलाटा कथितपणे खोलीत एकटाच होता, दरम्यान महिलांचा जबाब नोंदवल्यानंतर नराधमाला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे.