Russia's Highest Civilian Honour: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना रशिया (Russia) चा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वात प्रतिष्ठित नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' देऊन अधिकृतपणे सन्मानित केले. जागतिक नेता म्हणून पंतप्रधान मोदींचा दर्जा सातत्याने वाढत आहे. अनेक देशांनी त्यांचा परदेशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव केला आहे. गेल्या 10 वर्षात जवळपास 15 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला आहे. यामध्ये अनेक मुस्लिम देशांचाही समावेश आहे.
रशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी आज राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. यादरम्यान त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केले. रणांगणावर तोडगा निघणे शक्य नाही, चर्चेने प्रश्न सोडवले पाहिजेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -PM Modi Russia Visit: PM मोदी मॉस्कोत पोहोचले, मंगळवारी रशिया शिखर परिषदेत होणार सहभागी - VIDEO)
आपल्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शांतता अत्यंत महत्त्वाची आहे, पण युद्धभूमीवर उपाय शक्य नाही हे मलाही माहीत आहे. बॉम्ब, बंदुका आणि गोळ्या यांच्यात तोडगा आणि शांतता चर्चा यशस्वी होत नाही. आपल्याला चर्चेतूनच शांततेचा मार्ग स्वीकारावा लागेल. भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. (हेही वाचा -PM Modi Russia Visit: पंतप्रधान मोदी रशियाला रवाना; मोदी-पुतिन भेटीमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये वाढला तणाव, वाचा सविस्तर)
पहा व्हिडिओ -
#WATCH | Russian President Vladimir Putin confers Russia's highest civilian honour, Order of St Andrew the Apostle on Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/aBBJ2QAINF
— ANI (@ANI) July 9, 2024
#WATCH | Prime Minister Narendra Modi says, "...I extend my heartfelt gratitude to you (President Putin) for honouring me with Russia's highest (civilian) award. This honour is not just mine, this is the honour of 140 crore Indians. This is the honour of the centuries-old deep… pic.twitter.com/NpfcVImn4U
— ANI (@ANI) July 9, 2024
दहशतवाद भयंकर आणि घृणास्पद - पंतप्रधान मोदी
यावेळी पीएम मोदींनी पुतिन यांच्यासमोर दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, गेल्या 40-50 वर्षांपासून भारत दहशतवादाचा सामना करत आहे. दहशतवाद किती भयानक आणि घृणास्पद आहे. गेल्या 40 वर्षांपासून आपण त्याचा सामना करत आहोत. मी कल्पना करू शकतो. मॉस्कोमध्ये जेव्हा दहशतवादी घटना घडल्या तेव्हा किती वेदना झाल्या असतील. मी तुम्हाला खात्री देतो की हा कार्यकाळ आमचे संबंध अधिक घनिष्ठ करेल.