PM Modi meets Yunus(फोटो सौजन्य - ANI)

BIMSTEC Summit: थायलंडमधील बिमस्टेक शिखर परिषदेच्या (BIMSTEC Summit) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुरुवारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस (Mohammad Yunus) यांची भेट घेतली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांमधील ही पहिली अधिकृत बैठक आहे. दोन्ही नेत्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बांगलादेशातील सत्ता परिवर्तनानंतर, मुहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सत्तेत आल्यानंतर युनूस यांची मोदींसोबत पहिली भेट -

मोहम्मद युनूस सत्तेत आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध खूपच बिघडले होते. सीमेवर घुसखोरांच्या कारवायाही वाढू लागल्या. दरम्यान, मोहम्मद युनूस यांच्या विरोधात बांगलादेशातील लोक आवाज उठू लागला आहे. तिथे लोक लवकर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. (हेही वाचा - Earthquake In Myanmar-Thailand: म्यानमार-थायलंडमध्ये भूंकप! पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांना दिला मदतीचा हात)

पहा व्हिडिओ - 

मोहम्मद युनूस गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींना भेटण्याचा प्रयत्न करत होते. मोहम्मद युनूस यांच्या विनंतीवरून बिमस्टेक परिषदेदरम्यान ही बैठक निश्चित करण्यात आली होती. त्याआधीही रात्रीच्या जेवणाच्या वेळी दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले.