Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीआमध्ये भूस्खलनात 300 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 100 पेक्षा अधिक घरांचे नुकसान
Photo Credit -X

Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीआमध्ये एन्गा प्रांतातील काओकलम गावात पहाटे भूस्खलन (Papua New Guinea Landslide) झाल्याची घटना घडली घडली आहे. या भूस्खलनात 300 हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाी दबल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय, 100 पेक्षा अधिक घरे मातीखाली गाडली गेली आहेत. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काओकलम गावात 1 हजार 182 घरे असल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा:Heat Wave in Pakistan: पाकिस्तानमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर; हजारो नागरिक रुग्णालयात दाखल, तापमानाचा पारा 51 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता )

सध्या तिथे बचावकार्य सुरू आहे. भूस्खलनामुळे सहाहून अधिक गावांना फटका बसला आहे. त्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान, मृतांचा आकडा मोठा असण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. भूस्खलनाने वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याने या भागात पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर हा एकमेव पर्याय असल्याची माहिती डेक्कन हेरल्डच्या हवाल्यामुसार मिळत आहे.

भूस्खलनानंतर तेथील एकूण परिस्थीतीचे (Landslide) अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहे. व्हिडिओंमध्ये मोठ-मोठे दगड, उन्मळून पडलेली झाडे अशी दृश्य दिसत आहेत. लोक मातीच्या ढिगाऱ्यांखाली आपल्या नातेवाईकांना शोधत आहेत. अनेक महिला आक्रोश करत आहेत. देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी आपत्ती अधिकारी, संरक्षण दल, बांधकाम, महामार्ग विभाग मदत आणि घटनास्थळी बचावकार्य करत असल्याची माहिती दिली आहे.