प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

पाकिस्तानातील (Pakistan) सिंध प्रांतातील कोटरी येथे अज्ञात व्यक्तींनी एका हिंदू मंदिराची तोडफोड केली. या घटनेनंत स्थानिक हिंदुमध्ये संताप निर्माण झाला आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्स मध्ये याबद्दल माहिती दिली गेली आहे. हल्लेखोरांनी मंदिरात तोडफोड केली आणि दिवाळीपूर्वी चोरी सुद्धा केली. ही घटना शुक्रवारी समोर आली आहे. हल्लेखोरांनी मुर्ती तोडल्यानंतर लाखो रुपयांची रोकड आणि अन्य मौल्यवान सामान घेऊन पळ काढला आहे. या प्रकारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या अल्पसंख्यांक समुदायाच्या सुरक्षिततेची पोलखोल झाली आहे.

कोटरी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणताही अटक झालेली नाही. पाहेंजी वृत्तपत्राने असे म्हटले की, अल्पसंख्यांक मंत्र्यांनी क्षेत्रातील एसएसपीकडून रिपोर्ट मागितली आहे. पाकिस्तानी मीडिया नुसार, गुरुवारी रात्री हैदराबादच्या जमशोरोच्या कोटरी येथीर दरिया बँन्ड परिसरात प्राचीन शिवमंदिरात हल्ला करत सोने, मुर्त्या, प्रसाद, युपीएस बॅटर आणि अन्य मौल्यवान सामानाची चोरी केली आहे. त्याचसोबत देवतांच्या मुर्त्यांची सुद्धा तोडफोड केली आहे. चोरी करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत 20-25 लाख रुपये आहे.(Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात अर्थव्यवस्थेचे तीनतेरा, पैशासाठी एका महिलेने पोटच्या मुलीला विकले)

पाकिस्तान मीडियानुसार, अल्पसंख्याक प्रकरणी प्रांतीय मंत्री ज्ञान चंद इसरानी यांना सुचना मिळाल्यानंतर 48 तासांच्या आतमध्ये एसएसपी जमशोरो यांना घटनेचा रिपोर्ट देण्यासह आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे. कोटरी पोलिसांनी अज्ञात लोकांच्या विरोधात रिपोर्ट दाखल करुन तपास सुरु केला आहे. याच दरम्यान, मंदिराच्या सुरक्षिततेत अधिक वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला हिंदू समुदायाला असे वाटते की. 4 नोव्हेंबर रोजी दिवाळीपूर्वी हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. हिंदू अल्पसंख्यांकांनी मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे.