पाकिस्तानातील खासदार आमिर यांनी 18 वर्षीय तरुणीसोबत केला विवाह, तिसऱ्या लग्नानंतर भडकली मुलगी
Marriage | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Pakistan: पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष पीटीआयचे खासदार आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरे लग्न केले. याचीच सध्या पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु यांच्या लग्नावर आमिर यांची मुलगी दुआ आमिर ही चांगलीच भडकल्याचे दिसून आले आहे. खरंतर दुआ हिला 49 वर्षीय वडिलांनी 18 वर्षीय तरुणीसोबत लग्न केल्याने विविध प्रश्नांसह कमेंट्स करत आहेत. त्यावर तिने नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दुआ आमिर हिने इंस्टाग्राम स्टोरीत लोकांना विनंती केली आहे की, तिच्यासह परिवारासंबंधित कोणत्याही कमेंट्स करणे बंद करावे. माझे हे अकाउंट आर्टच्या कामासाठी आहे आणि जर तुम्ही यासाठी माझ्याकडे दुर्लक्ष करत असाल तर अनफॉलो करु शकता. तसेच आपल्या खासगी आयुष्याबद्दल कोणतीही कमेंट किंवा मेसेजचे उत्तर देणार नसल्याचे ही दुआ हिने तिच्या आणखी एका इंस्टाग्रामवरील स्टोरीत म्हटले आहे.(Pakistan: पंजाबमध्ये 'इज्जतीच्या नावाखाली' 6 महिन्यात 2400 महिलांची अब्रु लुटली, 90 जणांची हत्या)

दुआ आमिर हिच्या वडिलांन 18 वर्षीय तरुणी सईदा दानिया शाह हिच्यासोबत लग्न केले आहे. तर बुधवारी त्यांची दुसरी पत्नी पाकिस्तानी अभिनेत्री टूबा आमिर हिला तलाक दिल्याने सांगितले आणि त्यांनी तिसरे लग्न केल्याचे म्हटले. त्यांची तिसरी पत्नी आणि त्यांच्यामधील वयाचे अंतर पाहता पाकिस्तानातील लोक मीडियावर विविध प्रतिक्रिया देण्यासह मिम्स शेअर करत आहेत.

लग्नानंतर दोघांनी मिळून पाकिस्तानी पॉडकास्टर नादिर अली यांनी एक इंटरव्यू सुद्धा दिला. त्यामध्ये त्या दोघांनी एकमेकांचा हात पकडल्याचे दिसून येत आहे. जेव्हा सईदा हिला विचारले की, तुला यांच्यावर पहिल्यांदा प्रेम कधी जडले तर तिने बालपणी असे उत्तर दिले.