Pakistan Government Twitter Account Banned in India: पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या कायदेशीर मागणीवरून हे करण्यात आले आहे. ट्विटरच्या या निर्णयामुळे आता पाकिस्तान सरकार @GovtofPakistan च्या या खात्याचे कोणतेही ट्विट भारतात दिसणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे. तीन आठवड्यांपूर्वीही हे पाऊल उचलण्यात आले होते.
ट्विटरच्या धोरणानुसार, स्थानिक नियमांनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे सुरक्षा आणि स्थानिक कायदे लक्षात घेऊन वापरकर्त्याच्या अभिव्यक्तीचा आदर करते. ही बंदी तीन आठवड्यांपूर्वी लागू करण्यात आली होती. (हेही वाचा - Russia Ukraine War: युक्रेनच्या चार प्रदेशांचा रशियामध्ये समावेश, राष्ट्राध्य व्लादिमीर पुतीन यांच्याकडून करारावर स्वाक्षरी)
The Twitter account of the Government of Pakistan withheld in India pic.twitter.com/60Uzpoujwz
— ANI (@ANI) October 1, 2022
दरम्यान, केंद्र सरकारने पीएफआयवर नुकतीच 5 वर्षांची बंदी घातल्यानंतर त्यांचे ट्विटर अकाउंटही बंद करण्यात आले. केंद्र सरकारच्या तक्रारीनंतर ट्विटरने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात ईडी आणि एनआयएने पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या तळांवरून पीएफआयचे दहशतवादी संघटना अल कायदा आणि इतर संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे एजन्सीला मिळाले होते.