'Best Toilet paper in the World'  म्हणजे पाकिस्तानचा झेंडा, Google वर सर्च करुन पाहा
पाकिस्तानचा झेंडा म्हणजे बेस्ट टॉयलेट पेपर, Google वर सर्च करुन पाहा (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Pakistan Flag in Toilet Paper Google Search: जर तुम्ही गुगल (Google) वर 'जगातील बेस्ट टॉयलेट पेपर' (Best Toilet paper in the World) सर्च केल्यावर तुम्हाला पाकिस्तानचा झेंडा (Pakistan Flag) दाखवला जात आहे. नुकत्याच झालेल्या पुलवामा भ्याड हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून पाकिस्तान विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर नवीन ट्रेंड म्हणून पाकिस्तानबद्दल सर्च केल्यावर प्रथम 'जगातील बेस्ट टॉयलेट पेपर' म्हणजे पाकिस्तानचा झेंडा असे दिसून येत आहे.

गूगलवर टॉयलेट पेपर सर्च केल्यावर पाकिस्तानचा झेंडा दाखवू लागल्याने नेटकऱ्यांनी स्क्रिन शॉट काढून तो ट्वीटरवर पोस्ट करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सोशल मीडियावर गुरुवारी (14 फेब्रुवारी) सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 40 जवानांनी आपले प्राण गमावले. (हेही वाचा-After Pulwama Terror Attack: पुलवामा हल्लानंतर राजौरी येथेही IED स्फोट; 1 मेजर शहीद, एक जवान जखमी)

गुगलची ही पहिलीच वेळ नसून त्याचे एल्गोरिद्मस एका वेगळ्या ढंगात काम करत आहे. गेल्या वर्षीही गुगलवर इ़डियट (Idiot) सर्च केल्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे नाव आणि फोटो झळकावला जात होता. तसेच अमेरिकेच्या नागरिकांनी ट्रम्प यांच्या विरुद्ध 'अमेरिकन इडियट' नावाचे गाणे गाऊन त्यांचा विरोध केला होता. त्यामुळेच आता ही पाकिस्तानवर टीकेची झोड उठवल्याने गुगलवर सर्च केल्यावर असे दिसून येत आहे.