After Pulwama Terror Attack: पुलवामा हल्लानंतर राजौरी येथेही IED स्फोट; 1 मेजर शहीद, एक जवान जखमी
File image of security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

After Pulwama Terror Attack: जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) येथील राजौरी (Rajouri) जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर (Naushera sector) सेक्टरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा स्फोट झाला. लाइन ऑफ कंट्रोल (LoC) जवळ हा इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस ब्लास्ट (IED Blast) घडला. या स्फोटात एक मेजर दर्जाचा अधिकारी शहीद झाला. तर, एक जवान गंभीर जखमी झाला. दहशतवाद्यांनी पेरलेली स्फोटकं निकामी करताना हा स्फोट झाल्याचे समजते. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर मध्ये एलओसी (LoC) पासून सुमारे 1.5 किलोमीटर दूर अंतरावर हा स्फोट झाला.

नौशेरा सेक्टरमध्ये जानेवारी महिन्यापासून झालेला हा दुसरा आयईटी स्फोट (IED Blast) आहे. राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये या आधी 11 जानेवरी रोजी स्फोट झाला होता. यात एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यासोबत त्याचे दोन सहकारी शहीद झाले होते. दरम्यान, सुट्टी संपवून कर्तव्यावर निघालेल्या जवानांच्या ताफ्यावर जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात चौदा फेब्रुवारी या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. या ताफ्यातील 70 वाहनांतून तब्बल २,५४७ जवान कर्तव्यावर निघाले होते. दरम्यान, हल्लेखोराने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक जवानांच्या ताफ्यातील वाहनाला दिली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची भावना निर्माण झाली आहे.त्यानंतर बॉलिवुडमधीलही अनेक कलाकारांनी आणि दिग्गज व्यक्तिमत्वांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळे येथे शहीद जवानांच्या कुटुंबीयांन आधार दिला. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात धुळे येथे बोलताना पंतप्रधान म्हणाले, शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी स्वत:ला एकटं समजू नये. या कुटुंबीयांचं दुख: मोठं आहे. देशातील सव्वाशे कोटी जनता या कुटुंबांसोबत आहे. ज्या आईंनी भारतमासेसाठी शहीद होणाऱ्या वीर जवानांना जन्म दिला त्यांना मी नमन करतो. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुलवामा (Pulwama Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे सात्वन करीत धीर दिला. तसेच, शहीद जवान कुटुंबीयांच्या आश्रूंचा बदाल घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा कठोर शब्दांमध्ये हल्याचा सूत्रधार असलेल्या पाकिस्तानला इशाराही दिला. (हेही वाचा, Pulwama Terror Attack: अमिताभ बच्चन यांच्याकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत)

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. ही लाट काम असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (16 फेब्रुवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.