Paetongtarn Shinawatra (फोटो सौजन्य - X/@prdthailand)

Thailand Youngest Prime Minister: माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा (Thaksin Shinawatra) यांची सर्वात धाकटी मुलगी 37 वर्षीय पायतोंगटार्न शिनावात्रा (Paetongtarn Shinawatra) यांची थायलंड (Thailand) च्या 31व्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्यांना 319 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या सर्वात तरुण पंतप्रधान असतील. पायतोंगटार्न शिनावात्रा या थायलंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान असणार आहेत. श्रेष्ठा थविसिन यांच्यानंतर त्या देशाच्या पंतप्रधान असतील.

श्रेष्ठा थविसिन यांना बुधवारी घटनात्मक न्यायालयाने नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पदावरून हटवले. त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या मंत्रिमंडळ सदस्याच्या नियुक्तीचे प्रकरण समोर आले होते. (हेही वाचा -Same-Sex Marriage in Thailand: थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता; ठरला आग्नेय आशियातील पहिला देश, ऑक्टोबरमध्ये पहिला लग्नसोहळा)

पायतोंगटार्न शिनावात्रा बनल्या देशाच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान -

पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात पतंगटार्न शिनावात्रा म्हणाल्या की, श्रेथा यांना हटवल्याने मला दु:ख झाले आहे. त्यांनी श्रेथा, त्यांचे कुटुंब आणि पक्षाच्या लोकांशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी ठरवले की देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. वडील थाक्सिन आणि काकू यिंगलक शिनावात्रा यांच्यानंतर पंतप्रधान होणारे पतंगटार्न या शिनावात्रा कुटुंबातील तिसऱ्या सदस्य आहेत. (हेही वाचा:Same-sex Marriage in Thailand: थायलंडच्या संसदेत समलिंगी विवाह विधेयक मंजूर, LGBTQ+ समुदायाचा मोठा विजय! )

यिंगलक शिनावात्रा या थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. 7 मे 2014 रोजी घटनात्मक न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना पदावरून हटवण्यात आले. पेतोंगटार्न शिनावात्रा या थाई पक्षाचे प्रभावी नेत्या आहेत. त्या 11 पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ 314 खासदार आहेत. एकमताने पंतप्रधान निवडण्यासाठी सर्व खासदारांद्वारे पेतोंगटार्न यांच्या नामांकनासाठी सरकार स्थापन करण्यासाठी किमान 247 मतांची आवश्यकता असते. पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल सर्व नेत्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.