क्रूरतेचा कळस: खवळलेल्या 'किम जोंग'ने जनरलचे हात आणि धड तोडून खायला दिले नरभक्षक माशांना; जाणून घ्या कारण
किम जोंग (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर कोरियाचा (North Korean) हुकुमशाह किम जोंग (Kim Jong) पुन्हा खवळला आहे. पुन्हा एकदा त्याने क्रूर शिक्षा देऊन आपले महत्व सिद्ध केले आहे. यावेळी त्याने आपल्या जनरलला नरभक्ष पिरान्हा (Piranha) माशांच्या तळ्यामध्ये फेकून मारून टाकण्याची शिक्षा दिली आहे.  हा जनरल जोंगविरुद्ध कट रचत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी जोंगने आपल्याच देशाच्या पाच राजदूतांना देहदंड ठोठावला होता. या घटनेनंतर त्याची बरीच नाचक्कीही झाली होती. आता परत एकदा त्याने क्रूरतेचा कळस गाठला आहे. इंग्लंडची वृत्तसंस्था डेली स्टार (Daily Star) ने याबाबत वृत्त दिले आहे.

मृत्यूचे कारण स्पष्ट नाही -

सध्या सर्वत्र किम जोंगच्या या क्रूर निर्णयाचीच चर्चा सुरु आहे. अहवालानुसार जोंगने ब्राझीलमधून या पिरान्हा माशांची आयात केली आहे. पिरान्हा मासे जगातील सर्वात घातक आणि धोकादायक मासे आहेत. त्यांचे दात इतके मोठे आणि टोकदार असतात की ते संपूर्ण माणूस खाऊ शकतात. आधी या जनरलचे हात आणि धड वेगळे केले गेले आणि नंतर त्याचे शरीर या माशांनी भरलेल्या तलावात फेकून दिले. मात्र जनरलचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे कारण समजू शकले नाही. (हेही वाचा: पाच राजदूतांना देहदंड; डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा अयशस्वी ठरल्याने हुकुमशाहा किम जोंग उन याने दिली शिक्षा)

असे म्हटले जात आहे की, किम जोंग आपल्या सहकाऱ्यांना खास संदेश देण्यासाठी अशा क्रूर शिक्षेचा वापर करत आहे. जो कोणी त्याचा विश्वासघात करेल त्याची अशीच अवस्था होईल असे त्याला यातून सांगायचे आहे. याआधी किमने आपल्या भाषणादरम्यान कुटुंबातील काही सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी योग्य प्रकारे टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून जोंग त्यांना मारून टाकले होते.