Aung San Suu Kyi: भारताचा शेजारी म्यानमारमध्ये सत्तांतराची चिन्हे; आंग सान सू की यांच्यासह राष्ट्रपती लष्कराच्या ताब्यात, आणिबाणीचेही वृत्त
Aung San Suu Kyi | (Photo Credits-Facebook)

भारताचा शेजारी देश म्यानमार (Myanmar) येथून एक मोठे वृत्त आहे. म्यानमारमध्ये सद्या सत्तांतराची चिन्हे दिसत आहेत. म्यानमार येथील सर्वात मोठ्या नेत्या आंग सान सू की ( Aung San Suu Kyi) , राष्ट्रपती विन मिंट आणि सत्ताधारी पक्षाच्या अनेक व्यक्तिंच्या घरावर आज सकाळी छापेमारी करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. म्यानमारमध्ये एक वर्षासाठी आणीबाणी ( Emergency in Myanmar) लावण्यात आल्याचेही वृत्त आहे. सत्ताधारी पार्टी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी ( National League) पक्षाच्या च्या प्रवक्त्यांनी सोमवारी (1 फेब्रुवारी) ही माहिती दिली. सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाऊल सरकार आणि बलाढ्य लष्करात वाढत्या तनावानंतर उचलण्यात आले आहे. हा तणाव निवडणुकीनंतर वाढला होता.

साधारण काही दशकापूर्वी मान्यमानरमध्ये लष्करी राजवट आली होती. ही राजवट पुढे 50 वर्षे कायम राहिली. तेव्हापासून म्यानमार येथे लोकशाही अजून पाय धरु शकली नाही. नोव्हेंबर 2020 मध्ये संसदीय निवडणुकीत सत्ताधारी NLD पक्षावर निवडणूकीत फेरफार केल्याचा आरोप झाला होता. या निवडणुकीत NLD पक्षाचा मोठा विजय झाला. परंतू, या विजयाकडेही संशयाच्या नजरेने पाहिले गेले. (हेही वाचा, Donald Trump Impeached: दोनदा महाभियोगाची कारवाई होणारे डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष)

Aung San Suu Kyi | (Photo Credits-Facebook)

म्यानमारच्या नवनिर्वाचित संसदेची आज पहिली बैठक होती. त्याआधीच लष्कराने सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्यांना ताब्यात गेतले आहे. भारतासाठी ही एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण म्यानमार हा भारतासाठी शेजारी देश आहे. तसेच, भारताचे परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि इतरही आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसाठी म्यानमार भारतासासाठी महत्त्वाचा आहे.

सरकार आणि लष्कर यांच्यात झालेल्या तनावाच्या स्थितीनंतर अनेक नेत्यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवल्याचे वृत्त आहे. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पक्षाचे प्रवक्ते मायो न्यूंट यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला बोलतना सांगितले की, राष्ट्रपती विन म्यिंट आणि इतर नेत्यांना आज सकाळी घेऊन जाण्यात आले. त्यांनी म्हटले की, मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो की घाईगडबटीत कोणतेही कृत्य करु नका. कायद्याचे पालन करा. या नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याचा संशय आहे. सोमावारी सकाळपासून दुरसंचार यंत्रणाही निट काम करत नसल्याचे पुढे आले आहे.

Aung San Suu Kyi | (Photo Credits-Facebook)

सरकारी टीव्ही आणि रोडिओ यांच्या कार्यक्रमाचेही प्रसारण थांबले आहे. काही तांत्रिक कारणामुळे टीव्ही, रेडिओ प्रसारण करु शकत नसल्याचे म्यानमारच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती देत म्हटले आहे.