अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा मध्ये आता चीफ टेक्नॉलॉजिस्ट पदावर भारतीय वंशाच्या A.C. Charania यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे तंत्रज्ञान धोरण आणि कार्यक्रम या विषयावरचे प्रमुख सल्लागार म्हणून चरानिया काम करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यांची नियुक्ती अमेरिकेतील वॉशिंग्टन मध्ये करण्यात आली आहे.
चरनिया हे ऑटोमेटेड एव्हिएशन कंपनी रिलायबल रोबोटिक्समध्ये (Reliable Robotics) product strategy मध्ये उपाध्यक्ष होते, जिथे त्यांनी corporate strategy चे नेतृत्व केले, यामध्ये प्रोडक्ट फिट, एंगेजमेंट आणि रेलव्हंट मार्केट यांचा समावेश होता. त्यांनी उत्पादन डिझाइन आणि ग्राहकांच्या गरजा यांना पाहून तांत्रिक आणि व्यावसायिक धोरण पूर्ण करण्यासाठी काम केले. त्यांनी Emory University मधून अर्थशास्त्रात पदवी तसेच जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये आणखी एक बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
I am excited @ac_charania has joined @NASA as our new Chief Technologist. I look forward to working together to keep NASA at the cutting edge of technology! pic.twitter.com/WhQOTKgTA8
— Pamela Melroy (@Astro_Pam) January 10, 2023
जेफ बेझोसच्या मालकीच्या Blue Moon मध्ये चंद्र मोहीम संचालक म्हणून त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स वर काम केले आहे. त्यांच्या 20 वर्षांहून अधिक अनुभवामध्ये, त्यांनी Virgin Galactic आणि asteroid mining company Planetary Resources and Space Works Enterprises स्ट्रॅटिजी आणि बिझनेस ऑपरेशन टीम मध्ये वरिष्ठ सदस्य म्हणूनही काम केले आहे.