IAF एअर स्ट्राईसाठी मसूद अजहर हयाचा छोटा भाऊ मौलाना अम्मार याची कबुली, बालकोट येथील हल्ल्याची केली पुष्टी (Photo-PTI)

भारतीय वायुसेनाने (IAF) पाकिस्तान मधील बालकोट (Balkot) येथील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर एअर स्ट्राईक द्वारे जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) यांच्या नाकात दम भरला आहे. या गोष्टीची आता पुष्टी स्वत: जैश-ए-मोहम्मद याचा मुख्य मसूद अजहर याचा छोटा भाऊ मौलाना अम्मार याने केली आहे. यापूर्वी पाकिस्तान सरकारकडून भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईला नुकसान पोहवण्याचा बातमीला नाकारले होते. परंतु मौलाना अम्मार ह्याच्या एका ऑडिओमधून स्पष्ट झाले आहे की, IAF कारवाईमुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या ऑडिओमध्ये भारताच्या कारवाईला नुकसान पोहचवण्याचा हेतू स्पष्ट होताना दिसून येत आहे. पाकिस्तानी वरिष्ठ पत्रकार ताहा सिद्दीकी ने अम्मार ह्याचा ऑडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे, अम्मार ह्याचा सोशल मीडियावर हा ऑडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मौलाना अम्मार ह्याचा ऑडिओ 28 फेब्रुवारी रोजीचा आहे. त्यामध्ये एका कार्यक्रमाद्वारे संबोधित करताना भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्याबाबत बोलत असल्याचे ऐकायला येते. मौलाना अम्मार जैश-ए-मोहम्मद हा अफगाणीस्तान आणि काश्मिर येथे दहशतवादी हल्ल्ये करण्यासाठी मदत करत असतो. (हेही वाचा-पुलवामा हल्ल्यानंतर जैश संघटनेचा पाकिस्तानकडून बचाव, विदेश मंत्री कुरैशी यांनी जबाबदारी झटकली)

ऑडिओमध्ये मौलाना अम्मार सांगत आहे की, भारतीय वायुसेना जैशच्या मुख्य तळावर हल्ला करण्यात आला नाही. परंतु हल्ला जैश ह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक ज्या ठिकाणी होत असे त्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला आहे. या ऑडिओमधून अम्मार ह्याने भारताला हल्ला करण्याचा इशारा देत असून भारतात घुसुन जवानांवर हल्ला करणार आहेत. तसेच लाल किल्ल्यावर त्यांचा झेंडा फडकवणार असल्याचे म्हणत आहे.