पुलवामा हल्ल्यानंतर जैश संघटनेचा पाकिस्तानकडून बचाव, विदेश मंत्री कुरैशी यांनी जबाबदारी झटकली
पाकिस्तानी विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी (Photo Credits-Twitter)

पुलवामा (Pulwama) दहशतावादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी टीकेची झोड सोसत असलेल्या पाकिस्तानने (Pakistan) दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाकिस्तानी विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी(Shah Mahmood Qureshi) यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत पुलवामा भ्याड हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे साफ नाकारले आहे. हा तर एक भ्रम असून जैश या संघटनेचा या हल्ल्यात काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

कुरैशी यांना मुलाखतीत असे विचारण्यात आले की, जैशने तर या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.मात्र कुरेशी यांनी विधानात बदल करुन त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नसल्याचे सांगितले आहे. त्याचसोबत कुरैशी यांनी मसूद अजहर हा त्यांच्या देशाचा असल्याचे ही मान्य केले होते. कुरैशी यांना मिळालेल्या माहितीनुसार अजहर हा पाकिस्तानात असून त्याची प्रकृती एवढी गंभीर आहे की तो घरातून बाहेर पडू शकत नसल्याचे म्हटले आहे.(हेही वाचा-जम्मू-काश्मिर: पुंछ येथे LoC वर पाकिस्तानी सैनिकांकडून जोरदार गोळीबार, तीन गावकऱ्यांचा मृत्यू)

मसूद अजहर विरुद्ध भारत कोणताही ठोस पाऊल किंवा अकाट्य प्रमाण (जे न्ययालयात दाखवले जाऊ शकतात) तर सरकार त्याच्या विरुद्ध कारवाई करु शकणार असल्याचे कुरैशी यांनी म्हटले होते. अजहर याचे पाकिस्तानात सक्रिय जैश-ए-मोहम्मदचे मुख्य तळ असून त्यांनी पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. भारत गेल्या काही वर्षांपासून त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जाण्यासाठी प्रयत्न करत आहे.