जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) मधील पुंछ (Poonch) जिल्ह्यातील नियंत्र रेषेवर पाकिस्तानी (Pakistan) सैनिकांकडून शुक्रवारी (1 मार्च) जबरदस्त गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका घरातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच अन्य दोन जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी मोर्टारचे गोळे आणि भारदस्त बंदुकींच्या निशाण्याने सामान्य लोकांच्या वस्तीवर हल्ला करण्याचे ठरविले. मात्र भारतीय जवानांनी या गोळीबाराला प्रतिउत्तर दिले. पुंछ जिल्ह्यातील सलोत्री येथे ही घटना घडली आहे.
या गोळीबारात रूबाना कौसर, मुलगा फजान आणि नऊ महिन्याची मुलगी शबनम हिचा मृत्यू झाला आहे. तर नवरा मोहम्मह यूसिन जखमी झाला आहे. यापूर्वी मानकोट जिल्ह्यातही पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आल्याने नसीम अख्तर नावाची महिला जखमी झाली होती. सलोत्री आणि मानकोट व्यतिरिक्त पुंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी आणि बालकोट भागात गोळीबार झाला. सातत्याने आठव्या दिवशी सुद्धा पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले.(हेही वाचा-तिनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पाकिस्तानच्या खोटेपणाचे पुरावे; आता पाकच्या कोणत्याही हल्ल्याचे उत्तर देण्यास तयार)
RK Angral, SSP Poonch: 3 civilians have died in ceasefire violation by Pakistan in Poonch district's Krishna Ghati sector. #JammuAndKashmir pic.twitter.com/LsxNOkWEIq
— ANI (@ANI) March 1, 2019
पाकिस्तानच्या सैनिकांनी गेल्या एका आठवड्यात 60 पेक्षा जास्त वेळा संघर्षविरामचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मिर मधील पुंछ, राजौरी, जम्मू आणि बारामुला जिल्ह्यातीस 70 असैन्य आणि सीमावर्ती भागाला निशाणा बनवले होते. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर नऊ लोक जखमी झाले. त्यामुळे पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेपासून पाच किलोमीटर अंतरावरील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.