Man Vs Wild With PM Modi (Screengrab/Youtube)

डिस्कव्हरी (Discovery) चॅनेल वरील 'मॅन वर्सेस वाइल्ड' (Man Vs Wild) मध्ये 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. या भागाचे चित्रीकरण जिम कॉर्बेट (Jim Corbett) येथील जंगलात झाले आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेयर ग्रिल्स (Bear Grylls) याने आपला मोदींसह भारतातील जंगलात प्रवास करण्याचा अनुभव शेअर केला आहे. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama)  यांनी सुद्धा या शोमध्ये भाग घेतला होता, या एपिसोडचा उल्लेख करत बेयर याने मोदी आणि ओबामा यांचा कार्यक्रमात सहभाग घेण्याचा हेतू एकच असल्याचे म्हंटले आहे. या दोन्ही नेत्यांनी निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने हे धाडसी पाऊल उचलले होते असेही बेयर याने सांगितले.

बेयर ग्रिल्स याने ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींचे कौतुक केले. मॅन वर्सेस वाइल्डच्या चित्रीकरणाच्या वेळी हवामानाची स्थिती बिकट होती यावेळी मोदींनी स्वतःसह आमच्या टीमला सुद्धा शांत ठेवले. त्यांचा हसमुख स्वभाव खरोखरच आदर्श आहे असे बेयर याने म्हंटले आहे. याशिवाय मोदी हे एक निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी आपल्या जीवनाचा बराच काळ हिमालयात काढला होता, पण आता वयानुसार त्यांना ही जंगल सफारी शक्य होईल याविषयी आम्हाला चिंता होती, पण त्यांनी हा पूर्ण प्रवास एखाद्या तरुणासारखा बिनधास्त व सहजतेने केला आहे असे सांगत बेयर ग्रिल्स याने मोदींची वाहवा केली.

पहा काय म्हणाला बेअर ग्रिल्स

हे ही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षिततेसाठी वाघाला मारण्याची सांगितली ट्रीक, बेयर ग्रिल्स याला मिळाले असे उत्तर

दरम्यान बेयर ग्रिल्स याने भारताच्या निसर्गविविधतेचे कौतुक करत याच्या संवर्धनासाठी केवळ एका व्यक्तीवर अवलंबून न राहता सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोदींचा हा प्रवास दाखवणारा एपिसोड आजवरचा जगातील कोणत्याही देशात सर्वाधिक पाहिला गेलेला भाग ठरेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.