पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षिततेसाठी वाघाला मारण्याची सांगितली ट्रीक, बेयर ग्रिल्स याला मिळाले असे उत्तर
Man Vs Wild (Photo Credits-YouTube)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) लवकरच डिस्कवरी चॅनलवरील प्रसिद्ध शो 'मॅन वर्सेज व्हाइल्ड' (Man Vs Wild) मधून झळकणार आहेत. या शो दरम्यानचा मोदी आणि बियर ग्रिल्स (Bear Grylls) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये मोदी देशाच्या प्राकृतिक विविधतेवर आणि प्रकृतिक संरक्षणाच्या उपायावर चर्चा करताना दिसून आले. त्याचसोबत अजून एक नवा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये मोदी बेयर ग्रिल्स हे मोदींना एका जंगलात घेऊन जात आहेत. तेथे गेल्यावर मोदींना हत्यारे बनवण्यापासून ते स्वत:चे रक्षण कसे करावे याबद्दल प्रशिक्षण देताना दिसून येत आहेत.

युट्यूबवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून बेयर ग्रिल्स जिम कॉर्बेट सारख्या सुंदर आणि खतरानक जंगलात असल्याचे सांगत आहेत. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, मोदी जरी देशाचे पंतप्रधान असले तरीही येथे जंगलाची हुकुमशाही आहे. दरम्यान ग्रिल्स यांचे लहानपाणासून ते आतापर्यंतचा अधिक काळ जंगलातच गेला आहे. तर मोदी यांनी म्हटले की माझ्या आयुष्यातील बहुतांश काळा हा हिमालयात घालवले आहे.

तसेच मोदीजी तुमच्या समोर वाघ आल्यावर तुम्हाला दिलेल्या भाल्याच्या सहाय्याने त्याच्यावर वार करा असे ग्रिल्सने त्यांना सांगितले. मात्र माझे संस्कार वाघाला किंवा अन्य कोणालाही मारण्याचा हक्क देत नाही असे उत्तर त्यांनी ग्रिल्स यांना दिले आहे.(डिस्कवरी चॅनेलवरील 'Man Vs Wild' या शो मध्ये दिसणार पंतप्रधान नरेंद्र मोदी, Watch Video)

नरेंद्र मोदी यांची ग्रिल्स सोबतची जंगलसफारी 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता डिस्कवरी चॅनलवर दाखवली जाणार आहे. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा सुद्धा या शोमध्ये यापूर्वी सहभागी झाले होते.