Bear Grylls and Narendra Modi (Photo Credits: Twitter)

सलग दुस-यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले नरेंद्र मोदी  कधी काय करतील याचा काही नेम नाही. ते नेहमीच काही ना वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात मग ते डिजिटल मिडियाच्या माध्यमातून असो किंवा रेडिओच्या. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असा अंदाज पाहायला मिळेल जो याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)डिस्कवरी (Discovery) चॅनेलवरील लोकप्रिय शो 'मॅन वर्सेस वाइल्ड' (Man Vs Wild) या शोमध्ये सहभाग घेणार आहेत. या शो च्या माध्यमातून नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुप्रसिद्ध बेयर ग्रिल्स (Bear Grylls) सह निसर्गातील विविधता आणि निसर्ग संवर्धनवरील उपायांवर चर्चा करताना दिसणार आहेत.

या कार्यक्रमाचे होस्ट बेयर ग्रिल्स ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सह केलेल्या या कार्यक्रमाच्या काही भागांचे व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यावर त्याने असं म्हटलं आहे की, 180 देशांतील लोक पंतप्रधान मोदी यांच्या कधीही न पाहिलेल्या पैलूशी एकरुप होतील. पाहा व्हिडिओ

45 सेकंदाच्या प्रोमो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अंदाज बघण्यासारखा आहे. यात मोदींनी स्पोर्टस वेश परिधान केला आहे. त्याचबरोबर ते बेयर सोबत एका छोट्या नावेतून प्रवास करताना दिसत आहे. तुम्ही देशाचे महत्त्वपूर्ण असा मनुष्या आहात, त्यामुळे तुमची सुरक्षा करणे हे परम कर्तव्य आहे.

हेही वाचा- नरेंद्र मोदी यांचा चिमुकला 'Special Friend' नेमका आहे तरी कोण? (See Photo)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा अंदाज आपल्याला 12 ऑगस्ट ला रात्री 9 वाजता डिस्कवरी चॅनलवर पाहायला मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात लोकप्रिय अशा या कार्यक्रमात याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सुद्धा सहभाग घेतला होता.