PM Modi Plays with baby (Photo Credits: Twitter/NarendraModi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपले सोशल मीडिया अकाउंट्स (Social Media Accounts) हे नेहमीच सक्रियरित्या हाताळत असतात. एखाद्या व्यक्तीचे कौतुक करायचे असो वा प्रसंगी विरोध दर्शवायचा असो त्यांच्या फेसबुक (Facebook) , इंस्टाग्राम (Instagram) किंवा ट्विटर (Twitter) अकाउंट वरून ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत असतात. त्यातही त्यांच्या फोटोंची विशेष नेटकऱ्यांमध्ये खास चर्चा असते, काल म्हणजेच मंगळवारी सुद्धा मोदींनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून आपल्याखास मित्रासोबत शेअर केलेला एक फोटो देखील असाच चर्चेचा विषय ठरला. गंमत म्हणजे हा फोटो कोणी मोठा नेता किंवा प्रसिद्ध सेलिब्रिटी सोबतचा नसून एका चिमुकल्या सोबतचा आहे.

मोदींनी एका लहानग्यासोबत फोटो पोस्ट करत त्याखाली, " आज मला भेटायला संसदेत हा खास मित्र आला होता" असे लिहिले होते, त्यांनतर अवघ्या काहीच तासात हा फोटो सर्वत्र तुफान व्हायरल झाला होता, पण या फोटोमधला हा खास मित्र नेमका आहे कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर इथे आहे तुमचं प्रश्नाचे उत्तर..

नरेंद्र मोदी इंस्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram

A very special friend came to meet me in Parliament today.

A post shared by Narendra Modi (@narendramodi) on

मोदींनी शेअर केलेल्या फोटोकडे पाहता अनेकानीं हा चिमुकला नेमका कोण याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले होते, काहींनी हा गृहमंत्री अमित शहा यांचा नातू असल्याचे म्हंटले होते तर काहींनी हा कोण्या पाहुण्यांचा मुलगा असेल असे अंदाज बांधले होते मात्र, यावर काही वेळाने झालेल्या उलगड्या नंतर हा भारतीय जनता पक्षाचे खासदार सत्यनारायण जटिया यांचा नातू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या पोस्टवर जम्मू- काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला यांनी हा फोटो म्हणजे मोदींनी टीकाकारांना दिलेले उत्तर असल्याचे म्हंटले आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानानंतर सर्वजण मोदींच्या प्रतिक्रियेची वाट बघत असताना त्यांनी इंस्टवर हा गॉड फोटो शेअर करून इतरांना जो विचार करायचा तो करा असा संदेश दिला आहे अशा आशयाचे एक ट्विट अब्दुल्ला यांनी केले आहे.

ओमर अब्दुला ट्विट

नरेंद्र मोदींनी अशा प्रकारे बाळासोबत फोटो शेअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही पण यावेळीच्या फोटोत त्यांनी या बाळाला खास मित्र म्हंटल्यामुळे अधिक चर्चा होत होत्या.