कोरोना व्हायरसचे (Coronavirus) जाळे आता जगभरात पसरले असून दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत अधिक वाढ होत आहे. याच पार्श्वभुमीवर लिथुआनिया (Lithuania) मधील एका नवऱ्याने बायकोला कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी बाथरुम मध्ये बंद केल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. खरंतर नवऱ्याला असे कळले की, इटली येथून आलेल्या एका महिलेला बायको भेटली होती. याच कारणास्तव त्याने बायकोला बाथरुममध्ये बंद करुन ठेवले. याबाबत महिलेने पोलिसांना कळवले असता त्यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेत घरी पोहचले.
स्थानिक पोलिसांच्या मते, सदर नवऱ्याने कोरोना व्हायरसच्या संक्रमाणापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर बायकोला बाथरुम मध्ये बंद केले. महिलेने तक्रार दाखल केली नसल्याने नवऱ्याला अटक करण्यात आलेली नाही. जगभरात कोरोना व्हायरसच लागण झाल्यानंतर लिथुआनिया येथे कोरोनाचे एक प्रकरण समोर आले आहे. ट्युनीशिया, जॉर्डन आणि इंडोनशिया मध्ये कोरोनाचे संक्रमणासह 70 देशांना सुद्धा त्याने पछाडले आहे. इटली येथे कोरोना व्हायरसची लागण झाल्याची 2036 प्रकरणे समोर आली आहेत. तसेत 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेच कोरोनाची लागण झाल्याची 100 प्रकरणे तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.(Coronavirus Outbreak: जगभरात COVID-19 ने घेतले 3000 बळी; 88,000 जणांना लागण)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने, देशातील कारखाने बंद पडले आणि रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत मोठी कपात झाल्याचे समजते. यामुळेच प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोना विषाणूचा चीनच्या उद्योग आणि ट्रॅव्हल सिस्टमवर खूप वाईट परिणाम झाला आहे.
Coronavirus पासून सुरक्षित राहण्यासाठी 'प्राणायाम' करा योगगुरु बाबा रामदेव यांचा सल्ला- Watch Video
नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रदूषण नियंत्रण उपग्रहांमध्ये, चीनमधील वायू प्रदूषणाच्या पातळीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गेल्या पंधरवड्यात चीनच्या कार्बन उत्सर्जनात किमान 10 दशलक्ष मेट्रिक टन घसरण झाल्याचे, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एका स्वतंत्र अभ्यासानुसार दिसून आले आहे.