Horse Loses Control During Coronation: इंग्लंडचा राजा चार्ल्स तिसरा (King Charles III) याचा राज्याभिषेक (King Charles III Coronation) मोठ्या थाटात पार पडला. ब्रिटनच्या 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्याच राज्याभिषेकात शनिवारी चार्ल्स तिसरा युनायटेड किंगडम आणि 14 राष्ट्रकुल राज्यांचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. या राज्याभिषेकाच्या बातम्या जगभरात सर्वच प्रसारमाध्यमांनी मोठ्या विस्तृतपणे प्रकाशित केल्या. या बातम्यांदरम्याने राजाच्या ताफ्यातील एक घोडाही चांगलाच चर्चेत आला आहे. हा घोडा भलताच बेलगाम झाला आणि थेट उपस्थितांच्या गर्दीतच घुसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजा चार्ल्स तिसरा वेस्टमिन्स्टर अॅबेहून (Westminster Abbey) बकिंगहॅम पॅलेसला (Buckingham Palace) परतल्यानंतर काही मिनिटांत ही घटना घडली. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळते की, राज्याभिषेक मिरवणुकीत सामील असलेला एक घोडा गर्दी पाहून बिधरला. घोडेस्वाराने त्याचा लगाम खेचण्याचा प्रयत्न केला खरा. पण घोडा पाठिमागे सरकत चक्क उपस्थित गर्दीतच शिरला. राजा चार्ल्स तिसरा वेस्टमिन्स्टर अॅबेहून बकिंगहॅम पॅलेसला परतल्यानंतर काही मिनिटांत घडलेल्या या घटनेचा व्हिडि सोशल मीडियावर व्हारल झाला आहे. (हेही वाचा, घोडेस्वारी करताना झालेल्या अपघातात मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया फायनलिस्ट सिएना वियर्ड हिचा मृत्यू; 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
ट्विट
During today's coronation of the British King Charles the Third, an agitated horse, which was part of the royal procession, ran into the audience watching the event on the streets of London pic.twitter.com/29RXPOwK2e
— Spriter (@Spriter99880) May 6, 2023
राजा तिसरा चार्ल्स याच्या राज्याभिषेकाचे वृत्त देताना न्यूयॉर्क पोस्टने या घटनेची दखल घेत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांना घेऊन जाणार्या गोल्ड स्टेट कोचच्या काही यार्डांच्या मागे ही घटना घडवी. या घटनेत हा घोडा राजाच्या रॉयल घराण्यातील एका आरोहित जवळपास धडकला. दरम्यान, सुरक्षा यंत्रणेला वाटले की, घोडा धडकल्याने कोणाला दुखापत झाली असावी. त्यामुळे स्टेचर आणण्यात आले मात्र कोणालाही दखलपात्र अशी दुखापत न झाल्याने स्ट्रेचरची गरज भासली नाही.