Sienna Weird (PC - Twitter/@thetribunechd)

Sienna Weird Passes Away: मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलियाची फायनलिस्ट सिएना वियर्ड (Sienna Weird) हिचे गुरुवारी वयाच्या 23 व्या वर्षी निधन झाले. यासंदर्भात ई न्यूजने माहिती दिली. घोडेस्वारी अपघातानंतर (Horse-Riding Accident) लाइफ सपोर्ट काढून घेतल्याने सिएना यांचे निधन झालं. ऑस्ट्रेलियन आउटलेटनुसार, सिएना 2 एप्रिल रोजी सिडनीतील विंडसर पोलो ग्राउंड्सवर स्वार होत असताना तिचा घोडा कोसळला. यानंतर तिला तातडीने वेस्टमीड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे तिने मृत्यूपूर्वी अनेक आठवडे लाइफ सपोर्टवर घालवले.

ब्यूटी क्वीनने सिडनी विद्यापीठातून इंग्रजी साहित्य आणि मानसशास्त्रात दुहेरी पदवी प्राप्त केली होती. तसेच तिने यापूर्वी गोल्ड कोस्ट मॅगझिनला सांगितले होते की, तिला जंपिंग शोविषयी खूप प्रेम आहे. ती 3 वर्षांची असल्यापासून घोडेस्वारी करत आहे आणि त्याशिवाय तिच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. (हेही वाचा -Viral: ऐकावे ते नवलचं! एका व्यक्तीला इतकी जोरात शिंक आली की मेंदूच्या फुटल्या नसा)

ती प्रत्येक आठवड्याच्या शेवटी न्यू साउथ वेल्स किंवा व्यापक ऑस्ट्रेलियाभोवती प्रशिक्षण आणि स्पर्धा करण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा ग्रामीण सिडनीला जात असे. तिच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर ख्रिस ड्वायर यांनी म्हटलं आहे की, तुम्ही जगातील सर्वात दयाळू आत्म्यांपैकी एक होता. तुम्ही गेल्यानंतर मला जगात अंधार दिसू लागला आहे. त्यांनी सिएनाच्या फोटोसह त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले की, 'आशा आहे की तू कुठेही असशील, तू असा ग्रेमलिन आहेस ज्याला आपण सर्व ओळखतो आणि प्रेम करतो. तुझी खूप आठवण येत आहे.'