Javed Akhtar | (Photo Credits: Twitter)

ख्यातनाम लेखक, कवी आणि चित्रपट गितकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला (Pakistan) पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन सुनावले आहे. उर्दू कवी फैज अहमद फैज (Urdu poet Faiz Ahmed Faiz) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लाहोर येथे आयोजित महोत्सवासाठी (Festival in Lahore) जावेद अख्तर यांनी गेल्या आठवड्यात पाकिस्तानला भेट दिली होती. या कार्यक्रमात बोलताना जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी या देशात (पाकिस्तान) मुक्त फिरत आहेत. ज्यामुळे आजही भारतीयांच्या मनामध्ये कटुता आहे, अशा शब्दात अख्तर यांनी सुनावले आहे.

उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लाहोर येथे आयोजित महोत्सवात बोलताना जावेद अख्तर यांनी भारत पाकिस्तान याच्यातील तणाव कमी व्हावा, अशी भावना व्यक्त केली. या वेळी बोलताना ते म्हणाले, भारतामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने हल्ले होत असतील आणि त्यामुळे भारतीयांचा पाकिस्तानवर राग असेल तर त्याला दोष देता येणार नाही. (हेही वाचा, जावेद अख्तर हिजाबवर झालेल्या वादावर म्हणाले, समर्थन करत नाही पण मुलींना धमकावणाऱ्या गुंडांना मी विचारतो, ही मर्दानगी आहे का?)

जावेद अख्तर व्यासपीठावरुन बोलत असताना श्रोत्यांमधील एकाने त्यांना प्रश्न विचारला की, आपण पाकिस्तानध्ये किती वेळा आला होतात आणि आपण भारतात गेल्यानंतर आपल्या देशातील लोकांना सांगणार का पाकिस्तानात चांगले लोकही राहतात. ते बॉम्ब टाकत नाहीत आणि आम्ही पाकिस्तानात आल्यावर प्रेमाने स्वागतही करतात.

ट्विट

जावेद अख्तर यांनी श्रोत्यांमधून आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, आपण एकमेकांवर दोषारोप करु नये. त्याने प्रश्न सुटणार नाहीत. दोन्ही देशांमधले वातावरण तणावपूर्ण आहे. जे कमी झाले पोहिजे. आम्ही मुंबईचे लोक आहोत. आमच्या शहरावर झालेला 26/11 हा सर्वात मोठा हल्ला होता. हे हल्लेखोर आजूनही तुमच्या देशामध्ये मोकाट फिरत आहेत. त्यामुळे पाकिस्तानबद्दल जर हिंदुस्तानी नागरिकांच्या मनात राग असेल तर तुम्हाला त्याबाबत तक्रार करता येणार नाही.

ट्विट

जावेद अख्तर यांनी पुढे बोलताना म्हटले की, भारताने पाकिस्तानी दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये भारतीय कलाकारांचे स्वागत करण्यात आले नाही. आम्ही (भारतीयांनी) नुसरत फतेह अली खान आणि मेहदी हसन यांच्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांचे स्वागत महत्त्वाच्या पाहुण्यांसारखे केले. तो कार्यक्रम सर्वत्र प्रसारीत केला आहे. तुम्ही (पाकिस्तान) मात्र कधीही भारतीय कलाकार, लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. जावेद आख्तर यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले.