Alibaba ग्रुपचे मालक Jack Ma यांची 2 महिन्यांनी पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती (Watch Video)
Chinese Billionaire Jack Ma | (Photo Credits: Wikimedia Commons)

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक अलिबाबा (Alibaba) ग्रुपचे मालक जॅक मा (Jack Ma) आज (20 जानेवारी) 100 ग्रामीण शिक्षकांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये दिसले. ऑक्टोबर 2020 नंतर ते पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसले. चीनी सरकारचं समर्थन असलेल्या वेबसाईट झेजियांग ऑनलाईन (Zhejiang Online) च्या माहितीनुसार, जॅक मा चीन मध्ये ग्रामीण शिक्षकांना संबोधित करताना दिसले. यावेळेस त्यांनी कोरोना वायरसचं संकट ओसरल्यानंतर आपली पुन्हा भेट होईल असं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी जॅक मा यांनी चीनी सरकारवर टीका केली होती. तेव्हापासूनच ते सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसत नव्हते. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं होतं. Fact Check: AC रिपेयर करताना दिसले अलीबाबा चे संस्थापक Jack Ma? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य.

काही दिवसांपूर्वीच्या मीडीया रिपोर्ट्सच्या माहिती नुसार, अलिबाबा ग्रुपचे मालक जॅक मा हांगझोउ (Hangzhou)मध्ये असण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले होते. तेथे अलीबाबचं मुख्यालय आहे. काही गोष्टींसाठी ते मुद्दामूनच आता आपली सार्वजनिक ठिकाणी कमी प्रमाणात उप्स्थिती दाखवत आहेत. तसेच पुढील काही काळ हे असेच सुरू असेल. असेदेखील स्पष्ट केले होते.

जॅक मा यांनी ऑक्टोबर महिन्यात चीन मधील वित्तीय नियामक आणि सरकारी बॅंकांवर टीका केली होती. चीन रेग्युलेटर्स खूप conservative आहेत त्यांंनी इनोव्हेटिक व्हायला हवं असं मत त्यांनी मांडलं होतं. जॅक यांच्या या वक्तव्यामुळेच चीन मधील सत्ताधीश कम्युनिस्ट पार्टी त्यांच्यावर नाराज असून त्यांच्यामधील संबंध बिघडले असावेत. यामुळे त्यांच्या ग्रुपचा भाग असलेल्या अ‍ॅन्ट ग्रुपचे 37 अरब डॉलर आयपीओ रद्द करण्यात आले आहेत. त्यांना शांघाय आणि हॉंगकॉंग स्टॉक एक्सचेंजमधून काढण्यात आले आहेत.