सोशल मीडियावर दररोज नवनव्या खोट्या बातम्या, व्हिडिओज व्हायरल होत असतात. सुरुवातीला खरे भासणारे हे व्हिडिओज नंतर फेक असल्याचे सिद्ध होते. सध्या अलीबाबा (Alibaba) चे संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात जॅक मा एसी रिपेयर करताना दिसत आहेत. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, एक व्यक्ती एसीच्या युनिटवर बसून एसी रिपेयर करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सर्वत्र एकच चर्चा रंगत आहे. संपूर्ण जग ज्यांच्या शोध घेत आहेत ते या व्हिडिओत दिसून येत आहेत.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती जॅक मा असून हा व्हिडिओ 2018 चा असल्याचे बोलले जात आहे. Share A News वेब पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, एसी बनवणारा व्यक्ती जॅक मा सारखा दिसत आहे. मात्र व्हिडिओतील व्यक्ती जॅक मा नाहीत. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील दावा फेक आहे.
पहा व्हिडिओ:
जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले नाहीत. चीनी सरकारच्या टीकेनंतर त्यांनी प्रसारमाध्यम, कार्यक्रमांपासून दूर राहणे पसंत केले असल्याचेही बोलले जात आहे. (Alibaba founder Jack Ma चीन सरकार वर टीका केल्यानंतर गायब झाल्याच्या चर्चा? जाणून घ्या आता कुठेत)
Aah ternyataaa ....Jack Ma Dikirain menghilang, taunya lagi benerin AC.... pic.twitter.com/uLycdc3Fy9
— Zakaria Halim (@ZakariaHalim17) January 7, 2021
Finally Jack Ma found.. undercover as AC mechanic.. #jackmamissing #LOL pic.twitter.com/oG6t0BpSkh
— Rudy (@RudyRudraaksh) January 7, 2021
जॅक मा यांनी ऑक्टोबर महिन्यात चीन मधील वित्तीय नियामक आणि सरकारी बॅंकांवर टीका केली होती. जॅक यांच्या या वक्तव्यामुळेच चीन मधील सत्ताधीश कम्युनिस्ट पार्टी त्यांच्यावर नाराज असून त्यांच्यामधील संबंध बिघडले असावेत. त्यानंतर त्यांची सार्वजनिक उपस्थिती कमी झाल्याचे दिसून आले आहे.