China's richest man and Alibaba founder Jack Ma | (Photo Credits: Getty)

चीनी सरकारवर टीका केल्यानंतर मागील काही महिन्यांपासून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक जॅक मा (Jack Ma) यांची सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती आढळून न आल्याने मागील काही दिवसांपासून उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. द फायनॅन्शिअल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टीवी शो आफ्रिकज बिझनेस हिरोज च्या फायनल्स मध्येही परिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या जॅक मा यांना बदलण्यात आले होते. नक्की वाचा: Alibaba Founder Jack Ma Not Seen in Public: चीनी अब्जाधीश, अलिबाबा संस्थापक जॅक मा दोन महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत.

मीडीया रिपोर्ट्सच्या माहिती नुसार, अलिबाबा ग्रुपचे मालक जॅक मा हांगझोउ (Hangzhou)मध्ये असण्याची शक्यता आहे. तेथे अलीबाबचं मुख्यालय आहे. काही गोष्टींसाठी ते मुद्दामूनच आता आपली सार्वजनिक ठिकाणी कमी प्रमाणात उप्स्थिती दाखवत आहेत. तसेच पुढील काही काळ हे असेच सुरू असेल.

जॅक मा यांनी ऑक्टोबर महिन्यात चीन मधील वित्तीय नियामक आणि सरकारी बॅंकांवर टीका केली होती. चीन रेग्युलेटर्स खूप conservative आहेत त्यांंनी इनोव्हेटिक व्हायला हवं असं मत त्यांनी मांडलं होतं. जॅक यांच्या या वक्तव्यामुळेच चीन मधील सत्ताधीश कम्युनिस्ट पार्टी त्यांच्यावर नाराज असून त्यांच्यामधील संबंध बिघडले असावेत. यामुळे त्यांच्या ग्रुपचा भाग असलेल्या अ‍ॅन्ट ग्रुपचे 37 अरब डॉलर आयपीओ रद्द करण्यात आले आहेत. त्यांना शांघाय आणि हॉंगकॉंग स्टॉक एक्सचेंजमधून काढण्यात आले आहेत.

मागील महिन्यात चीन मध्ये अलिबाबाच्या विरोधात एक तपास सुरू आहे. तो पूर्ण होईपर्यंत त्यांना देशाबाहेर पडण्याची मुभा नसल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.