ई-कॉमर्स क्षेत्रात दबदबानिर्माण केलेल्या अलिबाबा (Alibaba) या कंपनीचा संस्थापक चीनी उद्योगपती अब्जाधीश जॅक मा (Jack Ma) बेपत्ता आहेत. गोल्या दोन महिन्यांपासून जॅक मा यांचे सार्वजनिक ठिकाणी दर्शन ( Jack Ma Not Seen in Public) घडले नाही. त्यामुळे ते संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची चर्चा रंगली आहे. अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. गेल्या काही काळामध्ये त्यांनी चीनच्या आर्थिक धोरण आणि वित्तीय मालकी असलेल्या बँकांवर टीकात्मक वक्तव्ये केली होती. जॅक मा आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यात काही वाद झाल्याचेही वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यानंतर चीन सरकारकडून जॅक मा यांच्या कंपन्यांवरही सातत्याने कारवाई केली जात आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जॅक मा यांनी चीनच्या आर्थिक धोरणांवार आणि सरकारी बँकांवर उघड टीका केली होती. जॅक मा यांचे अशा पद्धतीने बेपत्ता होणे संशयास्पद असल्याची चर्चा आहे. जॅक मा हे आपल्या भाषणांसाठी जोरदार लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी चीन सरकारने आपल्या प्रणालीमध्ये बदल करावा असे म्हटले होते. या वेळी त्यांनी म्हटले होते की, व्यवसायात नव्या गोष्टी सुरु करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. सरकारे दबाव टाकणे बंद करायला हवे. त्यांनी असेही म्हटले होते की, जागतिक बँकिंग चे नियम हे एक ज्येष्ठ नारिकांचा अड्डा आहे.
जॅक मा यांच्या वक्तव्यानंतर चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी भरतीच चिडली होती. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीकडून जॅक मा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. जॅक मा यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या व्यवसायातही अनेक अडचणी आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही काळापासून जॅक मा यांच्या कंपन्यांची जोरदार चौकशी सुरु आहे. (हेही वाचा, चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीने घेतली निवृती; 'अलिबाबा'चे संस्थापक Jack Ma वाढदिवसादिवशी अध्यक्षपदावरून पायउतार)
चीनच्या अधिकाऱ्यांनी जॅक मा यांची कंपनी एंट ग्रुपच्या 37 अरब डॉलरचे आयपीओंना निलंबीत केले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात तेव्हा राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांच्या आदेशानेच ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले होते.
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जॅक मा हे गेल्या दोन महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. ते काही नियोजीत कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे वृत्त होते. परंतू, अल्पावधितच विविध कार्यक्रमांतून निमंत्रितांच्या यादीत असलेले त्यांचे नाव गायब होत गेले.