भारतीय वंशाचा कॉमेडीयन Manjunath Naidu याचा स्टेजवरच मृत्यू; वयाच्या 36 व्या वर्षी कार्डियक अरेस्ट
Manjunath Naidu (Photo Credits: Twitter)

भारतीय वंशाचा स्टँड अप कॉमेडीयन मंजूनाथ नायडू (Manjunath Naidu) याचा दूबई (Dubai) येथे मृत्यू झाला आहे. तो अवघ्या 36 वर्षांचा होता. कार्यक्रम सुरु असतानाच मंजूनाथ नायडू याला कार्डियक अरेस्ट (Cardiac Arrest) आला आणि तो व्यासपीठावरच कोसळला. संयोजकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यााल उपचारापूर्वीच मृत घोषीत केले.

दूबईतील वृत्तपत्र खलीजा टईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कार्यक्रम सुरु असताना मंजूनाथ नायडू अचानक जमीनिवर खाली बसला आणि त्यानंतर तो व्यासपीठावरच झोपला. सुरुवाताला प्रेक्षक आणि संयोजकांना वाटले की, हा कार्यक्रमातील त्याच्या परफॉर्मन्सचा भाग असावा. पण, काही मिनीटे झाली तरी तो जागचा हाललाच नाही. त्यामुळे संयोजकांनी व्यासपीठावर जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.

मंजूनाथ नायडू याचा जन्म आबूदाबी येथे झाला होता. नंतर तो दुबईला स्थाईक झाला. ही घटना घडली तेव्हा मंजूनाथ त्याच्या परफॉर्मन्सच्या अखेरच्या टप्प्यात होता. त्याचा परफॉर्मन्स संपत आला होता. प्रेक्षकही त्याला हसून प्रचंड दाद देत होते. तो आपले कुटुंब आणि वडिलांसोबत घडलेल्या प्रसंगातील विनोदी किस्से सांगत होता. (हेही वाच, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे Cardiac Arrest आल्याने निधन)

प्राप्त माहितीनुसार, मंजूनाथ नायडूच्या वडिलांचे निधन झाले आहे. वडीलांचे निधन झाल्यानंतर तो दुबईत एकटाच राहात होता. त्याला एक भाऊ आहे. मात्र, तो त्याच्या जवळ नव्हता. तो कॉमेडी आणि कॉमेडीयन मित्र यांनाच आपले कुटुंब समजत होता.