Indian-origin Guru Raped His Devotees: भारतीय वंशाचा धर्मगुरू Rajinder Kalia चा अनेक भक्तांवर बलात्कार; यूके कोर्टाने ठोठावला 85 कोटींचा दंड
Indian-origin Guru Raped His Devotees (संग्रहित संपादित प्रतिमा)

Indian-origin Guru Raped His Devotees: काल उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबा नावाच्या एका धार्मिक गुरूच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन तब्बल 121 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा जास्त समावेश आहे. त्याचवेळी आता ब्रिटनमध्ये (United Kingdom) एक भारतीय वंशाचा हिंदू धर्मगुरू बलात्कार (Rape) प्रकरणात दोषी आढळला आहे. राजिंदर कालिया (Rajinder Kalia) असे या गुरुचे नाव असून, त्याच्यावर काही शिष्यांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. द मिररच्या रिपोर्टनुसार, राजिंदरने आपल्या प्रवचन आणि शिकवणींद्वारे शिष्यांवर चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न केला.

राजिंदरने भारतीय वंशाच्या चार विद्यार्थिनींवर बलात्कार केला असल्याची माहिती समोर येत आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या चार महिलांनी राजिंदरविरोधात तक्रार दाखल केली आहे. राजिंदर अनेक वर्षांपासून त्यांचे शोषण करत असल्याचा आरोप त्यातील तिघींनी केला आहे. याशिवाय पैसे न देता त्यांच्याकडून काम करून घेतल्याचाही आरोप या बाबावर आहे. त्यानंतर आता न्यायालयाने राजिंदर कालियाला 8 दशलक्ष पौंडांचा दंड ठोठावला.

राजिंदर कालिया वयाच्या 21 व्या वर्षी ब्रिटनला आला होता. त्यानंतर लगेचच 1986 मध्ये त्याने बाबा बालकनाथ मंदिराची स्थापना केली. तो त्याच्या कथित चमत्कारांद्वारे स्वतःला देव असल्याचे घोषित करतो. राजिंदर विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव सचित्रा आहे. या 68 वर्षीय बाबाने गेल्या अनेक वर्षांत अनेक खोटे दावे केले आहेत. आता या लैंगिक छळांच्या आरोपांमुळे हा बाबा पुन्हा चर्चेत आला आहे. पिडीत महिलांपैकी एकीने सांगितले की, राजिंदरने अनेक वर्षांत तिच्यावर कैकवेळा बलात्कार केला. आणखी एका 48 वर्षीय पीडितेने सांगितले की, राजिंदर तिचे ती 13 वर्षांची असल्यापासून शोषण करत आहे. 2017 मध्ये तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा राजिंदरच्या काही शिष्यांनी तिला ॲसिड हल्ल्याची धमकी दिली. (हेही वाचा: Hathras Stampede: जाणून घ्या कोण आहे भोले बाबा, ज्याच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांनी गमावला आपला जीव)

राजिंदरवर त्याच्या शिष्यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर 2.64 लाख रुपयांची लाच दिल्याचाही आरोप आहे. आता आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने राजिंदरला जवळजवळ 85 कोटींचा दंड ठोठावला. मात्र राजिंदरने आपल्यावरील आतापर्यंतचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपली बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे.