गूगल आणि अल्फाबेट मिळून टिक टॉक (TikTok) कंपनी खरेदी करणार अशी चर्चा गेली प्रदीर्घ काळ आंतराष्ट्रीय पातळीवर सुरु आहे. या चर्चेवर गूगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी खुलासा करत या चर्चेला उत्तर दिले आहे. सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी म्हटले आहे की, त्यांच्या कंपनीचा (गूगल) शॉर्ट व्हिडिओ मेकींग अॅप टिकटॉक ही चीनी कंपनी विकत घेण्याचा अजिबात विचार नाही. टिक टॉक खरेदी करणयाच्या स्पर्धेतही गूगल (Google) नाही. पॉडकास्ट पिवोट स्कूलेड लाईव्ह च्या नव्या एपिसोडमध्ये रिकोडच्या कारा स्विशर आणि न्यूयॉर्क विद्यापीठाचे प्रोफेसर स्कॉट गॅलवे यांनी पिचाई यांना विचारले की, गूगल टिक टॉक खरेदी करण्याबाबत विचार करते आहे का? या प्रश्नाच्या उत्तरार्थ पिचई बोलत होते.
स्कॉट गॅलवे यांच्या प्रश्नाचे सुंदर पिचाई यांनी नाही असे उत्तर दिले. पुढे बोलताना ते म्हणाले की, बाइटडांसकडे हक्क असलेले हे अॅप गूगलच्या क्लाऊड सेवा वापरण्यासाठी मोबदला देते. टिकटॉकचे अमेरिकेत 100 मिलियन म्हणजे 10 कोटी यूजर्स आहेत. परंतू, कंपनी गेल्या काही काळात सातत्यने ट्रम्प प्रशासनाच्या निशाण्यावर आहे. दरम्यान आता टिकटॉकने ट्रम्प प्रशासनाविरुद्ध न्यायालयात आव्हान दिले आहे. ट्रम्प प्रशासनाने टिकटॉकवर कारवाई करत प्रतिबंद लावले आहेत. त्यामुळे ही कंपनी न्यायालयात गेली आहे.
सुंदर पिचाई यांनी पुढे सांगितले की, कोरोना व्हायरस काळात तंत्रज्ञानातील इतर कंपन्यांनी प्रमाणेच टिकटॉकचीही आर्थिक भरभराट झाली आहे. पिचाई यांनी म्हटले की, अनेक अशा कंपन्या आहेत, ज्या कोरोना व्हायरस संकट काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुबत्त झाल्या आहेत. (हेही वाचा, TikTok चे सीईओ Kevin Mayer यांचा राजीनामा; ट्रम्प प्रशासनाविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यानंतर घेतला निर्णय)
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 ऑगस्टला जारी केलेल्या एका आदेशात बाइटडांस ला 45 दिवसांसाठी अमेरिकेत कोणताही व्यवहार करण्यास प्रतिंबद केला आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी 14 ऑगस्ट रोजी आणखी एक कार्यकारी आदेश जारी करत बाइटडांस ला 90 दिवसांमध्ये अमेरिकेत असलेला आपला टिकटॉक व्यवसाय विकण्याचा पर्या दिला होता.
दरम्यान, टिकटॉकने पहिल्यांदा कार्यकारी आदेशाविरुद्ध खटला दाखल केला. टिकटॉकने म्हटले आहे की, ते ट्रम्प यांच्या आदेशाशी असहमत आहेत. कारण त्यामळे टिकटॉटच्या राष्ट्रीय सुरक्षसाठी धोका आहे. इतकेच नव्हे तर, कंपनीने असेही म्हटले आहे की, अमेरिका प्रशासन त्यांची भूमिका योग्यपणे पार पडण्यात असफल ठरले आहे.