Coronavirus | Archived, edited, symbolic images

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जागतिक आरोग्य संकटाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोविड-19 च्या विळख्यात जगातील अनेक देश अडकले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिलेल्या माहितीनुसार, जगभरात एकूण 86 लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण असून 4.6 लाख रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार शनिवारी सकाळपर्यंत जगातील कोविड-19 ग्रस्तांचा आकडा 86,39,023 इतका झाला असून 4,59,437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (भारतामध्ये 24 तासांत सर्वाधिक 14516 नवे रूग्ण तर 375 जणांचा मृत्यू; COVID-19 बाधितांची संख्या 395048 वर)

CSSE नुसार जगभरात कोरोना बाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत एकूण 22,19,976 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 1,19,099 इतका मोठा आहे. यानंतर ब्राझील देशाचा नंबर लागतो. ब्राझीलमधील कोरोना बाधितांची संख्या 10,32,913 इतकी असून 48,954 मृतांची नोंद झाली आहे.

CSSE च्या आकडेवारीनुसार, अमेरिका, ब्राझील पाठोपाठ 5,60,321 कोरोना बाधितांसह रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारत (3,80,532), ब्रिटन (3,03,283), स्पेन (2,45,575), पेरू (2,44,388), इटली (2,38,011), चिली (2,31,393), इराण (2,00,262), फ्रान्स (1,96,083), जर्मनी (1,90,299), तुर्की (1,85,245), मॅक्सिको (1,70,485), पाकिस्तान (1,65,062), सौदी अरेबिया (1,50,292), बांग्लादेश (1,05,535) आणि कॅनडा (1,02,313)अशी क्रमवारी आहे.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 10 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये यूके (42,546), इटली (34,561), फ्रान्स (29,620), स्पेन (28,315), मॅक्सिको (20,394) आणि भारत (12,573) यांचा समावेश आहे.