कोरोना व्हायरसच्या जागितक आरोग्य संकटाने जगभरातील अनेक देशांना ग्रासले आहे. कोरोना विषाणूंच्या विळख्यात अडलेले अनेक देशांना औषध किंवा लसीअभावी या संकटावर मात करावी लागत आहे. दरम्यान जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 1.42 कोटींच्या पार गेली आहे. तर मृतांचा आकडा 601,000 हून अधिक झाला आहे. युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, रविवार (19 जुलै) पर्यंत जगभरात एकूण 14,231,248 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 601,213 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या अमेरिकत एकूण 3,707,023 कोरोनाग्रस्त असून 140,105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझील मध्ये 2,074,860 कोरोना बाधित रुग्ण असून 78,772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीमुळे कोरोना बाधितांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या स्थानी आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 10 लाखांच्या पार गेला असून त्यात दिवसागणित मोठी भर पडत आहे. त्यामुळे या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:
अमेरिका | 3,707,023 |
ब्राझील | 2,074,860 |
भारत | 1077618 |
रशिया | 764,215 |
दक्षिण आफ्रिका | 350,879 |
पेरु | 349,500 |
मेक्सिको | 338,913 |
चिली | 328,846 |
ब्रिटन | 295,632 |
इराण | 271,606 |
पाकिस्तान | 261,917 |
स्पेन | 260,255 |
इटली | 243,736 |
सौदी अरेबिया | 248,416 |
इटली | 244,216 |
तुर्की | 218,717 |
फ्रान्स | 211,943 |
जर्मनी | 202,426 |
बांग्लादेश | 202,066 |
कोलम्बिया | 182,140 |
अर्जेंटीना | 122,524 |
कॅनडा | 111,875 |
कतार | 106,308 |
10,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये ब्रिटन (45,358), मेक्सिको (38,888), इटली (35,042), फ्रान्स (30,155), स्पेन (28,420), भारत (26,816), इराण (13,608), पेरु (12,998) आणि रशिया (12,228) यांचा समावेश आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.