Germany Mass Shooting: हनाऊ शहरात दोन बारमध्ये बेधुंद गोळीबारात 8 ठार, 5 गंभीर जखमी
German Shooting (Photo Credits: ANI)

जर्मनी मधील फ्रॅंकफ्रुट शहराजवळ दोन ठिकाणी बेधुंद गोळीबारामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवार (19 फेब्रुवारी) च्या रात्री पहिला गोळीबार हनाऊ (Hanau) शहरामधील मिडनाईट बार मध्ये करण्यात आला आहे तर दुसरा अरेना बार (Arena Bar & Cafe) मध्ये झाला आहे. या दोन्ही गोळीबारात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी शहरामध्ये आता चोख बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान एकाच आरोपीने दोन्ही बारमध्ये गोळीबार केल्याचा संशय असला तरीही या गोळीबारामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. अरेना पोलिसांनी गोळीबार करणार्‍या एका संशयिताला अटक केली आहे. या हल्ल्यामधील जखमींमध्ये हल्ला करणार्‍या वडिलांचा (65) आईचा (56) समावेश असूनअन्य 3 महिला आणि 3 पुरूषांचादेखील समावेश आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारच्या रात्री सुमारे 10च्या आसपास मिडनाईट शिशा बारमधून 8-9 गोळ्या चालवण्याचा आवाज आला. तर जर्मनीच्या फ्रॅंकफ्रुट पासून 25 किमी अंतरावर असणार्‍या हनाऊ मध्ये 1 लाखाहून अधिक लोकं राहतात. गोळीबराच्या घटनेनंतर घटनास्थळावरून एका गाडीला जाताना पाहिलं आहे. तर दुसरी घटना शीशा बार - अरेना बारमध्ये झाली असून तेथे 5 जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. दुसऱ्या जागतिक युद्धानंतरची सर्वात मोठी चोरी; जर्मनीच्या वस्तुसंग्रहालयातून अब्जावधी रुपयांचे दागिने गायब.  

ANI Tweet

दरम्यान 2018 साली जर्मनीच्या म्युएंस्टरमध्ये एका माथेफिरूने वॅन लोकांचा अंगावर चढवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर 20 हून अधिक लोक जखमी झाले होते. गाडी चालकाने वर्दळीच्या ठिकाणी लोकांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना लक्ष्य केले होते.