दुसऱ्या जागतिक युद्धानंतरची सर्वात मोठी चोरी; जर्मनीच्या वस्तुसंग्रहालयातून अब्जावधी रुपयांचे दागिने गायब
जर्मन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दुसर्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी चोरी आहे. हे संग्रहालय ड्रेस्डेनच्या राजवाड्यात आहे. इथे चार हजारांहून अधिक मौल्यवान दागिने व हस्तिदंती वस्तू, सोने, चांदी तशीच अनेक अमूल्य रत्ने आहेत.
जर्मनीच्या ड्रेस्डेन (Dresden) येथील राजकीय वस्तूसंग्रहालय 'ग्रीन व्हॉल्ट' (Green Vault) मधून जवळजवळ 80 अब्ज रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या डायमंड ज्वेलरीचे सेट चोरीला गेले आहेत. सोमवारी पोलिस आणि संग्रहालय संचालकांनी ही माहिती दिली. जर्मन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दुसर्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी चोरी आहे. हे संग्रहालय ड्रेस्डेनच्या राजवाड्यात आहे. इथे चार हजारांहून अधिक मौल्यवान दागिने व हस्तिदंती वस्तू, सोने, चांदी तशीच अनेक अमूल्य रत्ने आहेत. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये 18 व्या शतकातील सॅक्सोनी (Saxony) शासक ऑगस्टस द स्ट्रॉन्गच्या संग्रहालयातील मोल्यावान हिऱ्यांचाही समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, सोमवारी पहाटे वीज पुरवठा खंडित झाल्यावर, चोरट्यांनी संग्रहालयात तोडले. यावेळी सर्वत्र अंधार होता तसेच वीज नसल्यामुळे संग्रहालयात गजरही नव्हता. परंतु संपूर्ण संग्रहायालयावर पाळत ठेवणारा कॅमेरा कार्यरत होता, ज्यामध्ये दोन लोक खिडकी तोडून संग्रहालयात प्रवेश करताना दिसत आहेत. 2017 मध्ये बर्लिनमधील बोडे संग्रहालयात 24 कॅरेट 100 किलो सोन्याचे नाणे चोरीला गेले होते. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध तर नाही ना या गोष्टीचाही पोलीस तपास करत आहेत. (हेही वाचा: गुजरात येथे मुकबधिर असल्याचे नाटक करत भामट्याने पळवले 40 लाख रुपयांचे हिरे)
चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये 100 हून अधिक मौल्यवान दागिन्यांचा सानावेश आहे. सोमवारी सकाळी दोन जणांनी हे चोरी केली. यामध्ये एक अब्ज युरो पेक्षा जास्त प्राचीन दागिन्यांची चोरी झाली आहे. उत्तरोत्तर इतिहासातील ही सर्वात मोठी कला चोरी असल्याचे सांगितले जात आहे. संग्रहालयात आग लागून चोरांनी राजवाड्यात प्रवेश केला आणि त्यानंतर वीजपुरवठा बंद करुन या दागिन्यांची चोरी केली. 1723 मध्ये सॅक्सोनी शासक ऑगस्टस द स्ट्रॉन्ग यांनी ग्रीन व्हॉल्टची स्थापन केली होती. हे संग्रहालय यूरोपमधील सर्वात प्राचीन संग्रहालयापैकी एक म्हणून ओळखले जाते. इथे युरोप खंडातील सर्वात मोठा खजिना संग्रह आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2019 07:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

