गुजरात (Gujrat) येथे एका भामट्याने हिरे व्यापाऱ्यासमोर मुकबधिर असल्याचे नाटक करत 40 लाख रुपयांचे हिरे लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपीने अत्यंत हातचालाखीने आणि मुकबधिर असल्याचे नाटक करुन दाखवत हे हिरे पळवले आहेत.
सुरत येथील महिंद्रापुरा डायमंड मार्केट येथे घडली आहे. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरी झाल्याची तक्रार करण्यात आला आहे. पिंकेश शहा असे व्यापाऱ्याचे नाव असून त्याने ही तक्रार पोलिसात दाखल केली आहे. पोलीस दुकानामधील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारावर चोराची ओखळ पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरोपी जेव्हा दुकानात आला त्यावेळी निळ्या रंगाची पँन्ट आणि सफेद रंगाचे शर्ट घातले असल्याचे व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यावेळी तो मुकबधिर असल्याचे नाटक करत त्याने व्यापाऱ्याला एक कागद काढून त्यावरुन मदत करण्यासाठी सांगू लागला. त्याचवेळी व्यापाऱ्याने त्याला पैसे काढण्यासाठी खिशात हात घालताच त्यामधील हिऱ्याचे पाकिट खाली जमिनीवर पडताच क्षणी या भामट्याने ते घेऊन पसार झाला आहे.