G20 Summit: ऑस्ट्रेलिया पंतप्रधान आणि पीएम नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा सेल्फी फोटो बनला चर्चेचा विषय, ट्वीटच्या माध्यमातून केले कौतूक
PM Narendra Modi (Photo Credits-Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी  सध्या  जपान (Japn) मधील  ओसाका मध्ये असून जी2 समिट (G-20 Summit) मध्ये सहभागी झाले आहेत. तसेच जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त नेतेमंडळींना या कार्यक्रमात आपला सहभाग दर्शवला आहे. यामध्ये अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, जपान पंतप्रधान शिंजो आबे आणि रुसचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यामध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडियात काही नेत्यांसमोरचे विविध फोटो समोर आले आहेत.

ऑस्ट्रेलिया पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा सेल्फी फोटो झळकावला आहे. मोदी यांच्यासोबत सेल्फी फोटो पोस्ट करत ऑस्ट्रेलियाचे पीएम स्कॉट यांनी असे म्हटले आहे की, मोदी स्वभावाला उत्तम आहेत. तर ट्वीटरवर ##G20OsakaSummit हॅशटॅगचा वापर करत पोस्ट लिहिली आहे.(One Nation One Ration Card: 'एक देश, एक रेशन कार्ड' आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन)

जपानमधील ओसाका शहरात जी-20 समिट व्यतिरिक्त ब्रिक्स नेत्यांची शुक्रवारी अनौपचारिक बैठक सुद्धा पार पडली. त्यावेळी मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत देशातील नागरिकांची हत्या करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.