परदेशातील व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी 'या' सरकारकडून घ्यावी लागणार NOC, निर्णयामुळे उडाला गोंधळ
लग्न | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

जर तुम्हाला परदेशातील एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले असेल आणि तुम्ही त्याच्यासोबत लग्न करु इच्छित असाल तर काही नियम माहिती असणे आवश्यक आहे. कारण श्रीलंका येथील सुरक्षा मंत्रालयाने त्यांच्या देशातील व्यक्तीसोबत लग्न करायचे असेल तर नागरिकाला सरकारकडून NOC घ्यावी लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक आणि काही सिव्हिल ग्रुपकडून याचा विरोध करण्यात आला आहे. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू केला जाणार आहे.

रजिस्ट्रार जनरल वीरासेकेरा यांनी 18 ऑक्टोंबरला जाहीर केलेल्या एका सर्कुलरमध्ये असे म्हटले होते की, हा निर्णय सुरक्षिततच्या कारणास्तव घेण्यात आला आहे. सर्कुलरच्यानुसार, संबंधिक अधिकाऱ्यांनी पदेशांसोबत श्रीलंकेच्या नागरिकांसोबत लग्न करतेवेळी निर्माण होणाऱ्या सुरक्षिततेच्या धोक्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, अशा प्रकारच्या लग्नाचे रजिस्ट्रेशन हे परदेशी नागरिकाद्वारे सिक्युरिटी क्लिअरेंस घेतल्यानंतर अॅडिशनल डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारच्या माध्यमातून केले जाऊ शकते.(पती-पत्नीचा इंटिमेट सीन फेसबुकवर लाईव्ह, महिलेकडून टिकटॉकवर अनुभव शेअर)

परंतु विरोधकांकडून या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे. खासदार हर्षा डी सिल्वा यांनी निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत असे म्हटले की, हा कोणत्या प्रकारचा भेदभाव आहे? नागरिक संघटनेशीसंबंधित काही लोकांनी सुद्धा सोशल मीडियावर सरकारच्या या पावलाचा विरोध केला आहे. परिपत्रकात असे म्हटले आहे की, सिक्युरिटी क्लियरेंस हे दाखवून देईल की, विदेशी पक्ष गेल्या महिन्याच्या दरम्यान कोणत्याही अपराधासाठी दोषी होता की नाही.

दुसऱ्या बाजूला शासकीय अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, हा निर्णय स्थानिक नागरिकांना लग्नाच्या नावे केल्या जाणाऱ्या फसवणूकीपासून वाचवण्यासाठी आणि लग्नाच्या बहाण्याने ड्रग्ज तस्करीत झालेल्या वाढीवर नजर ठेवण्यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यांनी असे ही म्हटले की, हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षितता लक्षात घेता दिला गेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. ज्या चिंता आणि असुरक्षितता समोर आले आहेत त्यानुसार सरकारने NOC अनिवार्य केली आहे.