स्वित्झर्लंडमध्ये पीएच.डी करत असलेल्या रोहिणी घावरी (Rohini Ghavari) या मुलीने उत्तर प्रदेशातील नगीनामधून निवडणूक लढवत असलेल्या 'भीम आर्मी'चे संस्थापक चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. आपण चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत नात्यामध्ये होतो आणि त्यामध्ये आपली फसवणूक झाल्याचा खुलासा रोहिणी घावरीने केला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका स्वच्छता कर्मचाऱ्याची मुलगी असलेल्या रोहिणीने चंद्रशेखर यांचा एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये ते तिच्यासोबतच्या व्हिडिओ कॉलवर रडताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ जारी करताना रोहिणी घावरी म्हणते, ‘हे खोटे अश्रू दाखवून त्याने मला विश्वास ठेवायला भाग पाडले. माझी चूक एवढीच होती की मी त्याला खरा आंदोलक मानले आणि त्याच्या समर्थनार्थ उभी राहिले. ज्या समाजावर मी प्रेम करते, परदेशात राहूनही ज्या समाजाचा विचार करते आज त्याच समाजासमोर मला खोटे पाडण्यात आले.’
यही झूठे आंशू दिखा दिखा कर मुझे विश्वास करने पर मजबूर कर दिया !! मेरी गलती सिर्फ़ इतनी थी की मैंने इन्हें सच्चा आंदोलनकारी इंसान मान लिया और साथ देने खड़ी हो गई !!
जिस समाज से में इतना प्यार करती हूँ विदेश में रहकर भी उनके लिए सोचती हूँ उन्ही नज़रों में मुझे झूठा साबित कर दिया… pic.twitter.com/udq9jpwySj
— Rohini Ghavari ( रोहिणी ) (@RohiniGhavari11) April 21, 2024
ती पुढे म्हणते, ‘मी एक मुलगी असण्याची खूप शिक्षा भोगली. आता मी माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकणार नाही, म्हणूनच मी लग्न आणि नातेसंबंध यासारख्या गोष्टींपासून दूर गेली आहे. आता माझे उर्वरित आयुष्य देश आणि समाजासाठी समर्पित आहे. मी खोट्या आरोपांना तोंड देऊन कंटाळले आहे.’ (हेही वाचा: UP Schocker: यूपी पोलीस कॉन्स्टेबलला विभागाने दिली नाही रजा; वेळेत उपचार न मिळाल्याने पत्नी आणि नवजात बाळाचा मृत्यू, चौकशीचे आदेश)
शादी छुपा कर ना जाने कितनी बहन बेटियों की इज़्ज़त के साथ खेलता रहा यह आदमी और यह औरत भी इसकी इस नौटंकी में शामिल रही क्योंकि करोड़ों रुपए जो मिल रहे थे इस आंदोलन से !!
पहले पता होता तो ना जाने कितनी मासूम लड़कियों की ज़िंदगी बर्बाद होने से बच जाती !!
झूठे आंशू दिखा दिखा कर समाज…
— Rohini Ghavari ( रोहिणी ) (@RohiniGhavari11) April 21, 2024
रोहिणीने मोठा आरोप केला की, ‘चंद्रशेखर आझाद याने आपल्या लग्नाबाबतची माहिती लपवून अनेक बहिणी-मुलींची फसवणूक केली. त्या ‘महिले’नेही त्याला साथ दिली, आंदोलनातून कोट्यावधी रुपये येत होते. हे आधी कळले असते तर अनेक निष्पाप मुलींचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असते.’ दरम्यान, रोहिणी ही जिनिव्हामध्ये राहत असून, ती शिक्षणाबाबत जनजागृती करण्यासोबतच दलित समाजासाठी आवाज उठवत असते. बाबासाहेब भीमराव आंबेडकरांवर तिची श्रद्धा आहे. तिला भारत सरकारकडून एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.