FBI Raid On Donald Trump: भारता पाठोपाठ अमेरीकेतही केंद्रीय एजन्सीचा छापेमारी पॅटर्न, डोनाल्ट ट्रम्प यांच्या घरावर FBI चा छापा
US President Donald Trump (Photo Credits: Twitter/@realdonaldtrump)

अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे FBI ने छापा टाकला आहे. आण्विक कागदपत्रांसह (Nuclear Documents) इतर वस्तूंच्या शोधासाठी ही छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे. फ्लोरिडा (Florida) 'मार-ए-लागो' (Mar-A-Lago) या निवासस्थानाची एफबीआय कडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान ट्रम्प यांच्या घरातून  कागदपत्रांनी भरलेले डझनभर बॉक्स (Box) ताब्यात घेतले आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या गैरहजेरीत त्यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे. तरी या छापेमारीतून बरीच खळबळजनक माहिती पुढे आल्याची चर्चा आहे.

 

सध्या अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल (Presidential Election Result) उलटवण्याच्या तर संबंधित कागदपत्रं हाताळण्यासंदर्भात अशा दोन प्रकरणांची चौकशी सुरु आहे. या कागदपत्रांच्या संबंधित चौकशीसाठीचं हा छापा टाकण्यात आल्याचं वॉशिंग्टन पोस्टच्या (Washington Post) सूत्रांनी दावा केला आहे. तर नॅशनल आर्काइव्हज अँड रेकॉर्ड अॅडमिनिस्ट्रेशन (NARA) ने 2022 मध्ये व्हाईट हाऊसच्या रेकॉर्डचे 15 बॉक्स जप्त केले. (हे ही वाचा:- Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये Dnipropetrovsk प्रदेशात रशियाचा रात्रभर बॉम्बवर्षाव, 21 ठार; गव्हर्नर Valentyn Reznichenko यांची माहिती)

 

या संपूर्ण FBI च्या  छापेमारी बाबत ट्रम्प यांनी छाप्याबाबत एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी सांगितलं की, एफबीआय अधिकाऱ्यांनी फ्लोरिडातील पाम बीचवर असलेल्या 'मार-ए-लागो’ या माझ्या निवास्थानी माझ्या पश्च्यात छापा टाकण्यात आला. अमेरीकेच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे. अमेरिकेच्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षांसोबत यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. माझ्या विरुध्द न्याय व्यवस्थेचा  गैरवापर केला जात आहे अशी प्रतिक्रीया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.