
Australia General Elections: ऑस्ट्रेलियामध्ये 3 मे रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, वाढती महागाई आणि घरांची कमतरता हे प्रमुख निवडणूक मुद्दे असण्याची अपेक्षा आहे. देशाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Prime Minister Anthony Albanese) यांचा डाव्या विचारसरणीचा 'लेबर पार्टी' सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. शुक्रवारी अल्बानीज यांनी गव्हर्नर जनरल सॅम मोस्टिन यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन निवडणूक प्रक्रिया सुरू केली आणि नंतर संसद भवनात पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर केली.
पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सांगितलं की, 'आमच्या सरकारने जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ऑस्ट्रेलियन मार्ग निवडला आहे. भविष्यासाठी उभारणी करताना राहणीमानाच्या खर्चाच्या दबावाचा सामना करणाऱ्या लोकांना मदत करण्याचा हा एक मार्ग आहे.' सध्या, अँथनी अल्बानीजच्या लेबर पार्टीकडे कनिष्ठ सभागृहात 78 जागा आहेत आणि ते दोन जागांच्या बहुमताने सरकार चालवत आहेत. (हेही वाचा -UAE Prisoners Release Order: यूएईच्या राष्ट्रपतींनी दिली ईदची भेट! 500 भारतीयांसह 1500 हून अधिक कैद्यांची करणार सुटका)
दरम्यान, विरोधी पक्षनेते पीटर डटन यांच्या लिबरल पक्षाच्या नेतृत्वाखालील रूढीवादी युती निवडणुकीत चांगली कामगिरी करेल असा अंदाज अनेक विश्लेषकांनी वर्तवला आहे. अल्बानीज सत्तेत आल्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये राहण्याचा खर्च वाढला आहे. गेल्या निवडणुकीपासून व्याजदर 12 वेळा वाढवण्यात आले आहेत. अल्बानीजने 2023 मध्ये पाच वर्षांत 12 लाख घरे बांधून घरांच्या कमतरतेवर मात करण्याचे आश्वासन दिले होते परंतु या दिशेने प्रगती मंदावली आहे.
On 3 May, vote Labor to keep building Australia's future.
— Anthony Albanese (@AlboMP) March 27, 2025
मतदारांसाठी प्रमुख मुद्दे -
अहवालांनुसार, देशातील आगामी निवडणुकांमध्ये राहणीमानाचा वाढता खर्च, अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि चीन यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. देशाने अलिकडच्या इतिहासातील राहणीमानाच्या खर्चात सर्वात तीव्र वाढ सहन केली आहे.