PM Modi With UAE President Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan (फोटो सौजन्य - X/@airnewsalerts)

UAE Prisoners Release Order: संयुक्त अरब अमिराती (UAE) चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (UAE President Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan)यांनी फेब्रुवारीच्या अखेरीस एक मोठी घोषणा केली. राष्ट्रपतींनी रमजान (Ramzan) पूर्वी मोठ्या प्रमाणात कैद्यांना माफी देण्याबद्दल बोलले होते. आता रमजानच्या शेवटी 1,295 कैद्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वृत्तानुसार, पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम (Prime Minister Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum) यांनी 1,518 कैद्यांना माफी देण्याची घोषणा केली आहे. सोडण्यात आलेल्यांमध्ये 500 हून अधिक भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.

यूएईच्या राष्ट्रपतींची कैद्यांना माफी देण्याची घोषणा -

दरम्यान, कैद्यांना माफी देण्याची घोषणा फेब्रुवारीच्या अखेरीस करण्यात आली. पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी एकूण 1518 कैद्यांना माफी देण्याची घोषणा केली आहे. ज्यांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश देण्यात आले त्यात 500 हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे. युएईच्या राष्ट्रपतींकडून माफी मिळाल्यानंतर, सुटका झालेले लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत ईद साजरी करू शकतील. (हेही वाचा -Indian Family Killed in US: भारतीय मुलगी आणि वडीलांची अमेरिकेत हत्या, व्हर्जिनिया गोळीबार प्रकरण; आरोपीस अटक)

युएईमध्ये भारतीयांची संख्या -

संयुक्त अरब अमिरातीच्या एकूण लोकसंख्येपैकी 37.96 टक्के भारतीय आहेत. डिसेंबर 2024 मध्ये, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये भारतीयांची लोकसंख्या 35,68,848 (3.6 दशलक्ष) होती. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय लोकसंख्या असलेला देश आहे. युएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी देशाच्या प्रत्येक क्षेत्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.