
US Crime News: अमेरिकेत असलेल्या भारतीय मुलगी आणि तिच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या (Indian Family Killed in US) करण्यात आली आहे. ही घटना व्हर्जिनिया (Virginia) येथील अॅकोमॅक काउंटीमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये घडली. ज्यामध्ये 24 मुलगी आणि तिचे 56 वर्षांचे वडील ठार झाले. हे दोघेही त्यांची हत्या ज्या स्टोअरमध्ये झाली त्याच स्टोअरमध्ये काम करत होते. गुरुवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर पुढच्या काही वेळात मारेकऱ्याने तिथे प्रवेश केला आणि त्यांच्यावर गोळीबार (US Gun Violence) केला. दुहेरी हत्याकांडामुळे परिसर हादरुन गेला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक
स्थानिक पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाच्या संदर्भात 44 वर्षीय जॉर्ज फ्रेझियर डेव्हॉन व्हार्टनला अटक केली आहे. वृत्तानुसार, व्हार्टन सकाळी लवकर दारू खरेदी करण्यासाठी दुकानात आला आणि दुकानातील कर्मचाऱ्यांना रात्री दुकान का बंद आहे याबद्दल विचारपूस केली. त्यानंतर त्याने वडील-मुलगी या दोघांवर गोळीबार केला. गोळीबारात जखमी झालेल्या प्रदीप पटेलचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी उर्मी पटेल हिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. (हेही वाचा, Las Cruces Shooting: लास क्रूसेस गोळीबारात तीन जण ठार, 15 जखमी, पोलीस तपास सुरु)
पीडित गुजरातमधील भारतीय स्थलांतरीत
पीडित प्रदीप पटेल, त्यांची पत्नी हंसाबेन आणि त्यांची मुलगी उर्मी हे मूळचे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील रहिवासी होते आणि सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले होते. ते त्यांचे नातेवाईक परेश पटेल यांच्या मालकीच्या सुविधा दुकानात काम करत होते. व्हर्जिनियामधील वेव्ही टीव्हीशी बोलताना, दुकानाचे मालक परेश पटेल यांनी या दुःखद घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. माझ्या चुलत भावाची पत्नी आणि तिचे वडील आज सकाळी काम करत होते. एक माणूस आला आणि त्याने गोळीबार केला. आता मी काय करावे तेच मला कळेना झाले आहे, असे तो म्हणाला. कुटुंबाला आणखी दोन मुली आहेत - एक कॅनडामध्ये राहते आणि दुसरी अहमदाबाद, भारत येथे राहते. (हेही वाचा, Gunmen Open Fire at Mexico Bar: मेक्सिको येथील बारमध्ये गोळीबार; 10 ठार, 7 जखमी)
आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई
अधिकाऱ्यांनी व्हार्टनवर प्रथम श्रेणीच्या खूनासह अनेक इतर गुन्ह्यांचा आरोप लावला आहे, ज्यामध्ये गंभीर गुन्हा आणि बंदुक कायद्याचे उल्लंघन यांचा समावेश आहे. गुन्ह्यामागील हेतू अजूनही तपासाधीन आहे. अमेरिकेतील भारतीय समुदाय या हत्येमुळे खूप अस्वस्थ आहे, विशेषतः उत्तर कॅरोलिना येथील एका भारतीय वंशाच्या व्यावसायिक मैनंक पटेल (36) यांची त्यांच्या दुकानात दरोडा टाकताना गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या काही महिन्यांनंतरच ही घटना घडली आहे.
दरम्यान, मेहसाणा येथील पटेल कुटुंबाला या बातमीने धक्का बसला आहे. प्रदीप पटेल यांचे काका चंदू पटेल यांनी सांगितले की, त्यांना स्थानिक माध्यमांच्या वृत्तांत आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून या दुर्घटनेची माहिती मिळाली. 'आम्ही त्यांच्या मुलीशी बोललो आणि तिने आम्हाला सर्व काही सांगितले,' असे ते पुढे म्हणाले. या भयानक गुन्ह्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेतील बंदुकीच्या हिंसाचाराबद्दल, विशेषतः लहान व्यवसाय करणाऱ्या भारतीय स्थलांतरितांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त झाली आहे.