Las Cruces Shooting | Photo Credit - ANI)

Mass Shooting in US: लास क्रुसेस (Las Cruces), न्यू मेक्सिको (New Mexico Crime) येथील एका उद्यानात येथे शुक्रवारी रात्री झालेल्या भयानक गोळीबाराने (Shooting) खळबळ उडाली. या घटनेत तीन किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही हिंसक घटना रात्री 10 वाजता (स्थानिक वेळेनुसार) यंग पार्कमध्ये (Young Park Shooting) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनधिकृत कार प्रदर्शनात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हा गोळीबार झाला.

मृतांची ओळख पटली

लास क्रुसेस पोलिस विभागाने फेसबुकवर दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन 19 वर्षांचे आणि एक 16 वर्षांचा मुलगा आहे. त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क करुन माहिती देण्याचे काम सुरू आहे. जखमींचे वय 16 ते 36 वर्षे आहे. आपत्कालीन सेवांनी तातडीने कारवाई करत सात जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या एल पासो येथील रुग्णालयात हलवले. चार जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे, तर उर्वरित चार जखमींची स्थिती अज्ञात आहे, असे लास क्रुसेस अग्निशमन प्रमुख मायकेल डॅनियल्स यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. (हेही वाचा, Gunmen Open Fire at Mexico Bar: मेक्सिको येथील बारमध्ये गोळीबार; 10 ठार, 7 जखमी)

घटनास्थळी सापडली काडतुसं

लास क्रूसेसचे पोलिस प्रमुख जेरेमी स्टोरी यांनी पत्रकारांना सांगितले की, हा सामूहिक गोळीबार एका भांडणानंतर उफाळला. पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही परंतु ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळावरून हँडगनच्या गोळ्यांचे काडतुसे सापडले आहेत. सुरुवातीला 14 जखमींची माहिती देण्यात आली होती, परंतु नंतर ती 15 असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तपासादरम्यान आणखी तपशील पुढे येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Gunmen Open Fire at Mexico Bar: मेक्सिको येथील बारमध्ये गोळीबार; 10 ठार, 7 जखमी)

जखमींवर रुग्णालयात उपचार, चौघांना डिस्चार्ज

मायकेल डॅनियल्स यांनी सांगितले की, 15 जखमींपैकी सात जणांना पुढील उपचारांसाठी एल पासो येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर चार जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित चार बळींची स्थिती सध्या अज्ञात आहे.

जबाबदार व्यक्तींकडून प्रतिक्रिया

दरम्यान, लास क्रूसेस पोलिसांनी गोळीबारामागील हेतूचा तपास सुरू ठेवला आहे आणि साक्षीदारांना कोणतीही माहिती देण्याचे आवाहन केले आहे. ही घटना टोळीशी संबंधित आहे की कोणत्याही चालू वादांशी संबंधित आहे हे अधिकाऱ्यांना अद्याप निश्चित झालेले नाही. अमेरिका-मेक्सिको सीमेच्या उत्तरेस 41 मैल अंतरावर असलेले लास क्रूसेस हे आता अमेरिकेत बंदुकीच्या हिंसाचाराचे नवीनतम ठिकाण बनले आहे, ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षितता आणि बंदुकांशी संबंधित गुन्ह्यांवर चिंता निर्माण झाली आहे.