Kim Jong-un | (Photo credit: archived, edited, symbolic images)

उत्तर कोरिया (North Korea) बाबत हुकुमशाह किम जोंग उनने (Kim Jong-Un) घेतलेले निर्णय नेहमीच चर्चेचे विषय ठरले आहेत. आताही किम जोंग उनने असाच एक निर्णय घेतला जो सध्या व्हायरल होत आहे. किम जोंग-उन कोरोना विषाणूला (Coronavirus) इतका घाबरला आहे की, आता त्याने पक्ष्यांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. हुकूमशहा किमला वाटते की शेजारचा चीनकडून येणारे कबूतर कोरोना व्हायरस घेऊन येऊ शकतात. म्हणूनच त्याने कबूतरांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर किम मांजरींकडेही संशयाने पहात आहे व त्याने मांजरींनाही मारण्याचे आदेश दिले आहेत.

द सनच्या वृत्तानुसार सीमाभागात राहणाऱ्या लोकांना कबुतर आणि मांजरी दिसताच त्यांना ठार कराव्यात अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नष्ट होऊ शकेल. विशेषतः, Hyesan आणि Sinuiju चे अधिकारी स्थानिक लोकांना कबूतर आणि मांजरी मारण्यास भाग पाडत आहेत. या आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. Hyesan  येथील रहिवासी असलेल्या एका कुटुंबाला मांजर पाळल्यामुळे आयसोलेशन केंद्रात पाठविण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर कुटुंबीयांनी सांगितले की त्यांच्या मांजरीचा मृत्यू झाला आहे.

हे प्राणी चीनमधून सीमेवरून धोकादायक व्हायरस आणत असल्याचा संशय 37 वर्षीय हुकूमशहाला आहे. मात्र कोरियाच्या नागरिकांनी किमच्या आदेशाला ‘अतार्किक’ म्हटले आहे. यापूर्वी असे उघडकीस आले होते की, एका अधिकाऱ्याच्या निधनानंतर उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने चीनी औषधांवर बंदी घातली आहे. (हेही वाचा: Kim Jong-Un ची क्रूरता; व्यक्तीला शिक्षा म्हणून 500 लोकांसमोर घातल्या गोळ्या; कुटुंबाला जबरदस्तीने पाहायला लावले दृश्य, जाणून घ्या काय होता गुन्हा)

आता हुकूमशहा किम जोंग उनच्या लहरी मूडमुळे, सीमा गस्त रक्षक देखील कबूतर आणि मांजरींना पकडण्याच्या कामात गुंतले आहेत. महत्वाचे म्हणजे केवळ किमच नाही तर त्याची बहीणदेखील विक्षिप्त मूडसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच किम यो जोंगने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते.